30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयपश्चिम बंगाल लढवलं की मोदी रडतील, खासदाराची वाणी खरी ठरली

पश्चिम बंगाल लढवलं की मोदी रडतील, खासदाराची वाणी खरी ठरली

टीम लय भारी

नवी दिल्ली :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाराणसीमध्ये आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संवाद साधताना अश्रू अनावर झाले. कोरोनामुळे निधन झालेल्या नागरिकांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला आणि ते भावुक झाले. पश्चिम बंगाल लढवलं की मोदी रडतील, खासदाराची वाणी खरी ठरली आहे (If West Bengal fights, Modi will cry, MP voice came true).

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी त्यांनी केलेला भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असे खासदार संजय सिंह यांनी गेल्याच महिन्यात म्हटले होते. आपल्या या भविष्यवाणीची आठवण खासदार संजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून करून दिली (MP Sanjay Singh shared his prediction on Twitter).

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बेस्ट सीएम आहेत मनसेचा खोचक टोला

कोरोनाने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं : पंतप्रधान मोदी

Coronavirus: India registers 2.57 lakh new infections, active cases fall below 30-lakh mark

आम आदमी पक्षाने एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Prime Minister Narendra Modi) व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्याचे म्हटले आहे. खासदार संजय सिंह यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेले भाकित २१ मे रोजी खरे ठरले, असे आपने पत्रकात नमूद केले आहे. १७ एप्रिल रोजी खासदार संजय सिंह यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी ‘अजून थोडे दिवस वाट पाहा. ते पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील,’ असे म्हटले होते.

याच मुलाखतीचा काही भाग शेअर करत खासदार संजय सिंह यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. ‘जे १७ एप्रिलला बोललो होतो, ते २१ मे रोजी खरे ठरले. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्ती हवी आहे. ढोंग करणारे पंतप्रधान (Prime Minister) देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचे नाटक करत आहेत,’ अशा शब्दांत खासदार संजय सिंह यांनी शरसंधान साधले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी