32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले - सुप्रिया सुळे

मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले – सुप्रिया सुळे

काही महिन्यांपासून शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोर्टाची तारीख पुढे ढकलत आहेत. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टाच्या सुनावणी वेळेस विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहत नाहीत. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. माहराष्ट्रात काय पोरखेळ चाललाय का? असा सवाल आता सुप्रीम कोर्टाने केला आहे. हे प्रकरण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लज्जास्पद असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर मंगळवारपर्यंत यावर निर्णय द्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना बजावले आहे.

जून महिन्यापासून शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. यावर आता ठाकरे गटाच्या 40 आमदारांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. तर शिंदे गटाने एकत्रित सुनावणीला विरोध करत वैयक्तिक याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता ठाकरे गट आणि शिवसेना हमरातुमरीवर आले आहेत. ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनावणी देखील एकत्रित केली जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड  सर्वोच्च न्यायालयात हजर होते. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना मी पहिल्यांदा कोर्टात आले, असे वक्तव्य केले.

हेही वाचा 

7 कोटी आले कुठून? छगन भुजबळ यांचा जरांगे पाटलांना सवाल

नाकापेक्षा मोती जड; तीन कोटीच्या पगारापोटी कमिशन मोजावे लागते एक कोटीचे!

नाकापेक्षा मोती जड; तीन कोटीच्या पगारापोटी कमिशन मोजावे लागते एक कोटीचे!

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

सर्वोच्च न्यायालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने संदर्भात एकत्रित सुनावणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीबाबत दिरंगाई केली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मी याआधी कधीच कोर्टाची पायरी चढली नाही. मुळात अशी वेळच आली नाही, असे वक्तव्य केले आहे. मी राजकारणात कोर्टकचेऱ्यांसाठी आलेली नाही तर सर्वसामन्यांची सेवा करण्यासाठी आलेली आहे. यामुळे वेळ आल्यावर आम्ही काही करू. राज्याची जनता आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, ही लढाई नैतिकतेची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट ही लढाई जिंकेल, न्याय देखील मिळेल. ही लढाई जनतेची लढाई आहे. सत्य-असत्यमधील ही लढाई आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी