30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयजयंत पाटील यांना 580 कोटी निधी मिळाल्याच्या बातमीचा फुसका बार, किती रक्कम...

जयंत पाटील यांना 580 कोटी निधी मिळाल्याच्या बातमीचा फुसका बार, किती रक्कम मिळाली ते विधानसभेत जाहीरच केले

अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्याव्दारे अनेक आमदारांना निधी वाटप केल्यानंतर विरोधकांनी निधीच्या असमान वाटपावरुन दोन्ही सभागृहात आवाज उठवला आहे. अशातच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांना ५८० कोटी रुपये निधी देण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांध्ये आल्यानंतर जयंत पाटलांनी सभागृहासमोर हा आकडा खोटा असल्याची माहिती दिली आहे.

अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी शिवसेना आमदारांना कमी निधी दिल्याचे सांगत शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर बरोबर एक वर्षांनी अजित पवारच या सरकारमध्ये सहभागी झाले असून त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार या सरकारध्ये मंत्री झाल्यानंतर पुरवणी मागण्यांचे विधेयक त्यांनी सभागृहत मांडले आहे. या विधेयकात अनेक आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला असून काही आमदारांना शुन्य रुपये निधी दिल्याचे काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात सांगितले होते. दरम्यान ज्या आमदारांना कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला आहे त्यांची नावे आणि मिळालेल्या निधीची आकडेवारी माध्यमांध्ये येऊ लागली. राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या आमदारांना देखील मोठा निधी मिळाल्याची आकडेवारी यामध्ये माध्यमांनी दिली.

राष्टवादीचे आमदार जयंत पाटील यांना तब्बल 580 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर जयंत पाटील यांनी याबबत सभागृहात माहिती दिली. जयंत पाटील यांनी सांगितले की, मला 580 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत्त मी वाचले. मात्र मला इतका निधी मिळालेला नाही. आणि तेवढा निधी मिळावा म्हणून मी कोणाला पत्र देखील दिलेले नाही. तसेच या निधीचे जे आकडे आहेत ते खरे आहेत असे मला वाटत नाही असे देखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरा तपासून घ्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

रंगकर्मीचे ‘अण्णा’ जयंत सावरकर यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार

लयच भारी तटकरे आणि पाटील यांची दुनियादारी.. विधिमंडळातील गळाभेटीने चर्चेला उधाण

जयंत पाटील म्हणाले, एवढा निधी माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही. मला 20 ते 22 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. ते म्हणाले, मी व्हाईट बूक तपासले तेव्हा त्यात मला इतक्या मोठ्या रकमेचा निधी मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे कोणाचा गैरसमज होऊ नये. असे सांगत आपल्याला 20 ते 22 कोटींचा निधी मिळाल्याचे जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी