31 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल : शरद पवार

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल : शरद पवार

टीम लय भारी

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते.  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्याचवेळी अनेकांनी तर्कवितर्क लढवले. शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहे. शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असे सांगतानाच महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावले (NCP Sarvesarva Sharad Pawar said that the government in Mahavikas Aghadi will last for five years).

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकांतात भेटल्याने त्यावरून अनेक वावड्या उठल्या होत्या. त्याचे खंडन करत पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका घेतल्या. पण शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहेत. शिवसेना हा विश्वासहार्य पक्ष आहे. लोकांच्या विश्वासावर हे सरकार काम करत आहे. त्यामुळे हे सराकर नुसते टिकणारन नाही तर पाच वर्षे टिकेल, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन

Shivsena is with us, says NCP Chief Sharad Pawar

सेना-राष्ट्रवादी पर्याय स्वीकारला

राज्यात वेगळ्या विचाराचे सरकार स्थापन केले. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असे लोकांना कधीच वाटले नव्हते. पण आपण एकत्र आलो. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असे ही त्यांनी सांगितले.

पक्ष आले, गेले, आपण 22 वर्षे टिकून

आपल्या देशात अनेक पक्ष निर्माण झाले. काही टिकले, तर काही कधी गेले ते कळलेही नाही. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात 70 च्या दशकात पक्ष स्थापन झाला होता. या पक्षाची अकरा राज्यात सत्ता आली. पण दीड वर्षही हा पक्ष टिकू शकला नाही. आपण 22 वर्षे टिकून आहोत. 15 वर्षे आपण सत्तेत होतो. मधल्या काळात सत्तेत नव्हतो. त्याने काही फरक पडत नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

अनेक सोडून गेले, नवीन लोक तयार झाले

या दरम्यानच, अनेक लोक आपल्याला सोडून गेले. पण नवीन लोक तयार झाले आहेत. नव्या लोकांचे कर्तृत्व कधीच दिसले नव्हते. त्यांना संधी मिळाली आणि त्यांचे कर्तृत्व समोर आले. देशभर कोरोनाचे संकट असताना राजेश टोपेंनी चांगले काम केले. राजेंद्र शिंगणेही चांगले काम करत आहेत. राजकारणात तरुणांना नेहमीच संधी दिली पाहिजे. पिढी तयार केली पाहिजे. राष्ट्रवादीने ही पिढी तयार केली आहे, असे त्यांनी सांगितले.

तर सत्ता भ्रष्ट होते

सत्ता ही महत्त्वाची आहे. पण एकाच ठिकाणी सत्ता राहता कामा नये. एकाच ठिकाणी सत्ता राहिली तर सत्ता भ्रष्ट होते. त्यामुळे सत्ता ही सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजे, त्यादृष्टीने प्रत्येकाने कामे केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी