29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय'में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं' म्हणत शरद पवारांनी केली नव्या...

‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं’ म्हणत शरद पवारांनी केली नव्या इनिंगची सुरुवात

शरद पवार हे छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्याची सुरुवात आज नाशिकमधून करण्यात आली आहे. यावेळी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर बोलले आहेत. ज्या पद्धतीने अजित पवारांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी अटलबिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं , असा दाखला देत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिले. मी पक्षासाठी काम करत असून माझ्याकडे कोणतेही मंत्रीपद नाही. मला निवृत्त व्हायला सांगणारे ते कोण आहेत? मी अजूनही काम करु शकतो,’ असे शरद पवार म्हणाले.

मी वयाच्या 83 व्या वर्षीही काम करु शकतो, कारण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काम करत राहण्याची विनंती केली होती. यापूर्वी अनेकांनी जोमानं मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. आमच्यासोबत मोरारजी देसाई अत्यंत वेगाने काम करायचे. तेव्हा त्यांचं वय 84 होतं. ते देशाचं किती काम करतात, याची चर्चा देशभरात व्हायची. त्यामुळे वयाचा काहीही मुद्दा नाही. पक्षाध्यक्षपदी माझी नियुक्ती बेकायदेशीर असेल, तर प्रफुल्ल पटेल आणि इतरांनी केलेल्या सर्व नियुक्त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, असेही शरद पवार म्हणाले. कारण अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांनीच माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. दिल्लीत एकमताने निवड झाली. असेही ते म्हणाले.

हे सुध्दा वाचा:

शरद पवार यांचे मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

…तर मी राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी; आमदारांच्या आपात्रतेबाबत लवकरच निर्णय

मी जेव्हा 1980 साली कॉंग्रेसमधून बाहेर पडलो त्यावेळी नाशिक जिल्हयाने आम्हांला जागा निवडून दिल्या होत्या. त्यावेळी लागोपाठ येवल्यातून जागा निवडून आल्या. छगन भुजबळ यांना नाशिकच्या सहकाऱ्यांनी येवल्यातून लढावं हे सुचवलं होतं. भुजबळांना सुरक्षित जागा द्यायची होती. अमोल कोल्हे कलेच्या क्षेत्रात विशिष्टपणे काम करत आहे. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात वावरत असताना दिसत असतात. कोल्हे हे राष्ट्रवादीत आले त्यांनी चांगल्याप्रकारे काम केले. ज्या मतदारसंघातून निवडून आले तिथे त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले असे म्हणत पवारांनी कोल्हे यांचं कौतुक केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी