28.2 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयबोगस बियाणेप्रकरणी हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे; कॉँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा सरकारवर आरोप

बोगस बियाणेप्रकरणी हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे; कॉँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा सरकारवर आरोप

बोगस बियाणे प्रकरणी आज विरोधकांनी सरकारला खिडीत गाठले. खतांच्या दरात वाढ झालेली नाही, अशी माहिती कृषीमंत्री गोपीनाथ मुंडेंनी सभागृहाला दिली. त्यामुळे विरोधक चिडले. बोगस बियाणे यावरून सत्ताधारी-विरोधक आमने सामने आल्याचे चित्र पहायला मिळाले. राज्यभरात हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे, असा घणाघाती आरोप कॉँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून बोगस बियांणे प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आदींनी राज्याच्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. बोगस बियाणे विक्रीप्रकरणी किती जणांवर कारवाई झाली, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. बोगस बियाणे प्रकरणी राज्यभरात हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे,असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. खतांमध्ये केंद्र सरकारकडून नफेखोरी होत असल्याचा आरोप थोरातांनी यावेळी केला. अनेक बँकांनी शेतकऱ्यांनी कर्ज दिले नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला. त्यावर राज्यभरात कोट्यवधीचं कर्जवाटप करण्यात आले, असे मुंडे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी गाठली; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरण चिघळलं, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं ट्विट चर्चेत

अजित पवारांचा वाढदिवस राज्यात ‘अजित उत्सव’ म्हणून साजरा करणार : सुनील तटकरे

पटोलेंनी केलेल्या आरोपांवर मुंडेंनी स्पष्टीकरण दिले. बोगस बियाणं प्रकरणावर जरब बसवू, असे मुंडे म्हणाले. या विषयावर चर्चा सुरु असताना विरोधकांनी सभात्याग केला. बोगस बियाणांवर नियंत्रण आणणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खतांची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. सरकारने अशा विक्रेत्यांना, कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. बीटी बियाण्यांसदर्भात जसा कायदा आहे. तसाच कायदा बोगस बियाणांसदर्भात करण्यात येईल. तसेच, केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात कपात केली आहे. मात्र, यामुळे खतांच्या दरात वाढ झालेली नाही, अशी माहिती मुंडेंनी सभागृहाला दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी