30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeराजकीयपंतप्रधान पदासाठी माझी पसंती राहुल गांधी; मल्लिकार्जुन खरगे

पंतप्रधान पदासाठी माझी पसंती राहुल गांधी; मल्लिकार्जुन खरगे

देशामध्ये लोकसभा निवडणूक आज संपणार आहे, आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. तर बुधवारी म्हणजे ४ जून रोजी या सर्व लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांमधील मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. त्यानंतर देशामध्ये १८ व्या लोकसभेचे पंतप्रधान कोण असतील हे ठरणार आहे. ज्या पक्षाच्या बाजूने मतदान होईल त्या पक्षाला पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागणार आहे. याबद्दलच इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? यावर प्रश्न उपस्थित असताना, पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती राहुल गांधी हेच आहेत.याबाबत एक वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.

देशामध्ये लोकसभा निवडणूक आज संपणार आहे, आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. तर बुधवारी म्हणजे ४ जून रोजी या सर्व लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांमधील मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. त्यानंतर देशामध्ये १८ व्या लोकसभेचे पंतप्रधान कोण असतील हे ठरणार आहे. ज्या पक्षाच्या बाजूने मतदान होईल त्या पक्षाला पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागणार आहे. याबद्दलच इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? यावर प्रश्न उपस्थित असताना, पंतप्रधान (prime minister) पदासाठी पहिली पसंती राहुल गांधी (Rahul Gandhi) हेच आहेत.याबाबत एक वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केले आहे.(My choice for the prime minister’s post is Rahul Gandhi; Mallikarjun Kharge)

खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की “इंडिया आघाडी हे देशाचे भविष्य ठरवणार आहे. २००४ आणि २००९ प्रमाणे आमच्या आघाडीचा निवडणुका जिंकण्याकडे कल आहे. त्यानंतर आमचे सर्व घटकपक्ष बसून पंतप्रधान पदाबद्दल निर्णय घेतील. आमचं सध्या एकमेव लक्ष भाजपाला सत्तेतून हटवणे आहे. यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल.” असं मत खरगे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केलं. पुढे बोलताना खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की “पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसमध्ये माझं भवितव्य काय असेल? याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पण पक्षामध्ये आमचे युवा नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) असताना आणि त्यांनी एवढा संघर्ष केला असताना माझी तरी पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती राहुल गांधी (Rahul Gandhi) हेच आहेत. त्यांना संपूर्ण देश ओळखतो. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अनेक खटल्यांना तोंड दिले आहे. त्यामुळे मला जर कोणी विचारलं तर माझी पसंती राहुल गांधी (Rahul Gandhi) असतील असं खरगे (Mallikarjun Kharge) यांनी स्पष्ट केलंआहे.

खरगे यांनी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातील उमेदवारीबद्दलही खुलासा केला. ते म्हणाले “मी राहुल आणि प्रियंका या दोघांना अमेठी आणि रायबरेली मधून निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. परंतु राहुल गांधींना देशामध्ये प्रचारही करायचा होता, त्यासाठी वेळही हवा होता आणि इतर उमेदवारांचा विचार करून त्यांनी रायबरेलीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही. प्रियंका गांधीही राहुलच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांनीही निवडणूक लढवली नाही.”
दरम्यान राहुल यांनी देशभर प्रचार केल्यामुळे देशामध्ये त्यांना सर्वजण अधिक प्रमाणात ओळखायला लागले आहेत. त्यासोबतच प्रियंकांच्या भाषणाचे मोठे आकर्षण कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसच्या पराभवासाठी मल्लिकार्जुन खरगे कारणीभूत असतील या अमित शहांच्या वक्तव्याचा खरगेंनी विरोध केला. ते म्हणाले “इंडिया आघाडीने चांगल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये काम केले आहे आणि पंतप्रधान मोदींनी जी भाषणे केली, त्या भाषणांमध्ये ते जे बोलले त्याची अपेक्षा मला नव्हती. ते खूपच चिडून भाषण करत होते, असं मला जाणवलं. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.” असं खरगे यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी