27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयनरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय...

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले होते. मोदींच्या रोडशोमुळे झालेले मुंबईकरांचे हाल कमी होते की काय आता या त्या रोडशोचा खर्च देखील मुंबईकरांच्या खिशातून झाल्याची चर्चा आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या रोडशो साठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे म्हटले असून हा खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले होते. मोदींच्या रोडशोमुळे झालेले मुंबईकरांचे हाल कमी होते की काय आता या त्या रोडशोचा खर्च देखील मुंबईकरांच्या खिशातून (public money) झाल्याची चर्चा आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या रोडशो साठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा (BMC spends Rs 3.5 crore) खर्च झाल्याचे म्हटले असून हा खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केल्याचा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.(Narendra Modi’s roadshow with public money, BMC spends Rs 3.5 crore; Sanjay Raut’s allegations)

देशाला चारशे पार चा नारा दिला असला तरी याआधी दोन वेळा झालेल्या प्रचंड फसवणुकीमुळे जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पायाखालची वाळू सरकलेला मोदीकडून महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. खुद्द नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सुमारे 25 जाहीर सभा घेतल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार 20 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे मोदी यांचा घाटकोपर येथे भाजपचे उमेदवार मिहीर कोठे यांच्या प्रचारासाठी रोडशो आयोजित केला होता.

या रोडशोसाठी मुंबईतील अनेक रस्त्यांचे काम करण्यात आले होते. पोलिसांनी अधिक कुमक बोलवण्यात आलेली बॅरिकेडस लावण्यात लावण्यात आलेले. मुंबई महापालिकेने या रोडशोसाठी 3 कोटी 56 लाख रुपये खर्च केले आहेत. हा भाजपचा खाजगी रोड शो होता तरी देखील करदात्यांच्या पैशातून याचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी