35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयवानखेडे प्रकरण: भाजपचा वसुलीच्या भागीदारीत सहभाग आहे का?; नवाब मलिकांचा सवाल

वानखेडे प्रकरण: भाजपचा वसुलीच्या भागीदारीत सहभाग आहे का?; नवाब मलिकांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणून आरोप करत असल्याची टीका भाजपचे नेते अमित मालविया यांनी केली आहे. यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यावर भाजपला त्रास का होत आहे? वसुलीच्या भागीदारीत भाजपचा सहभाग आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे (Nawab Malik’s question to BJP, is BJP involved in partnership?).

“समीर वानखेडे यांचा बोगसपणा आम्ही समोर आणत आहोत तर संपूर्ण भाजपला त्रास का होत आहे? जीन की जान तोते में है क्या? कहीं पोपट मर गया तो भाजप मर नहीं जायेगी? हजारो कोटींच्या वसुलीत भागिदारी आहे का. ही भागीदारी कुठून कुठपर्यंत आहे हे सांगावं लागेल,” असं नवाब म्हणाले.

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? एनसीबीविरोधात अजून एक पंच समोर, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा

समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांच्या आरोपांचे केले खंडन

नवाब मलिका यांच्यावर मंत्रिपदाचा वापर करुन माहिती मिळवत असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांवर देखील नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. मी माझ्या मंत्रालयाचा वापर करुन माहिती घेतली नाही. मी स्वत:च्या बळावर माहिती जमा केली आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांनी मला माहिती दिलेली नाही. ज्या दिवशी माझ्या जावयाला अटक झाली त्या दिवशी सांगितलं होतं की कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. देशाच्या न्यायव्यस्थेवर माझा विश्वास आहे.

नवाब मालिकांनी जाहीर केला समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’

Anti-Drugs Officer’s Nikah At Centre Of Maharashtra Minister’s New Attack

२७ सप्टेंबरला जामीन मिळाला आहे. साडे आठ महिन्यानंतर जामीन मिळाला. १२ तारीखला न्यायमुर्ती ए जोगळेकर यांनी सही केली आहे. १३ तारीखला न्यायमुर्ती ए जोगळेकर जे एनडीपीएस विशेष न्यायालयाचे न्यायाधिश आहेत, त्यांनी दिलेली ऑर्डर ऑनलाईन आहे. १४ तारीखला वर्तमानपत्रांमध्ये ऑर्डर छापण्यात आली आहे. त्या दिवशी मी तपशीलवार सांगितलं की जी कलमं लावण्यात आली ती लागत नव्हती पण लावण्यात आली हे सांगितलं होतं. मालवियाजी या मागे पण हाच खेळ होता. त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असं नवाब मलिक म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी