31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुस्लिमांबद्दल पुतणा मावशीचे प्रेम, पदाधिकाऱ्याचा पक्षाला 'रामराम'

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुस्लिमांबद्दल पुतणा मावशीचे प्रेम, पदाधिकाऱ्याचा पक्षाला ‘रामराम’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केला आहे. यासाठी त्यांनी दिलेले कारण खूप महत्त्वाचे आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात मुस्लीम समाजातील लोकांची अलीकडेच दुकाने फोडण्यात आली, काहींना मारहाण झाली, यात एकाचा मृत्यू झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मोठा नेता तिथे गेला नाही आणि पीडित कुटुंबाचं सांत्वन केले नाही.

नौशाद शिकलगार यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहून अल्पसंख्याक समाजाकडे पक्षामधूनच कसे दुर्लक्ष केले जाते, याकडे लक्ष वेधले आहे. या संदर्भात नौशाद यांनी १६ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवले होते. पण पक्षातील कुणीही त्या पत्राची दखल न घेतल्याने व्यथित होऊन पद आणि पक्षाच्या सदस्यत्वचा राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवारांना पाठवले.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या पुसेसावळी गावात १० सप्टेंबर रोजी आक्रीत घडले. त्या रात्री मुस्लीम समाजावर हल्ला झाल्याचा दावा शिकलगार यांनी केला आहे. या हल्ल्यात अनेकांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली, गाड्या फोडल्या, नमाज पठणासाठी आलेल्यांना मारहाण झाली. यात नुरुलहसन शिकलगार या ३० वर्षांच्या युवकाची हत्या करण्यात आली. शिवाय या हिंसाचारात १५ ते १८ जण जखमी झाल्याचाही दावा नौशाद शिकलगार यांनी केला आहे.

हे ही वाचा

भाजप 2024 आधीच फुटणार; संजय राऊतांची भविष्यवाणी !

माढ्याच्या खासदारकीसाठी अजित पवार गटाकडून संजीवराजे नाईक-निंबाळकर?

बारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार?

नुरुलहसन यांची पत्नी ७ महिन्यांची गरोदर असून आईवडील वृद्ध आहेत. त्यामुळे या कुटुंबाला राज्य सरकारने २५ लाख रुपयांची मदत करावी, असे पत्र नौशाद शिकलगार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्याची प्रत जयंत पाटील तसेच सुप्रिया सुळे यांनाही पाठवली होती. प्रत्यक्षात पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी पत्रावर कोणतीही कार्यवाही केली नाही. शिवाय पीडित कुटुंबाच्या भेटीलाही राष्ट्रवादीचे कुणी मोठे नेते गेले नाहीत. त्यामुळे नौशाद शिकलगार व्यथित झाले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीला रामराम करत असल्याचे पत्र अध्यक्ष शरद पवार यांना पाठवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी