29 C
Mumbai
Sunday, November 26, 2023
घरराजकीयभाजप 2024 आधीच फुटणार; संजय राऊतांची भविष्यवाणी !

भाजप 2024 आधीच फुटणार; संजय राऊतांची भविष्यवाणी !

नुकताच एनडीए आघाडीतून तामिळनाडू राज्यातील एआयडीएमके हा भाजपचा जूना मित्रपक्ष बाहेर पडला असून एनडीएसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी अकाली दल, शिवसेना (ठाकरे) यांनी देखील भाजपची साथ सोडली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. संजय राऊत म्हणाले, शिवसेना, अकाली दल नसेल तर एनडीएचे अस्तित्व शुन्य आहे. आज एनडीएत जे चित्र दिसत आहे, ते राहतेय की नाही याची शंका आहे. इतकेच काय तर 2024 पूर्वी भाजप पक्ष देखील फुटेल असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपडे जर नितीमत्ता, नैतिकता थोडीजरी शिल्लक असेल तर ते या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेतील असे राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांवर आमचा नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या १ वर्षापासून महाराष्ट्रात घटनेचा, कायद्याचा खून होताना दिसत आहे. त्याचे जर त्यांना काय वाटत नसेल तर विधिमंडळाच्या इतिहासात काळ्याकुट्ट पानावर त्यांचे नाव लिहिले जाईल, असे म्हणत राहूल नार्वेकर यांना त्यांनी सुनावले.

हे सुद्धा वाचा 
वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
‘ड्रीम11’ला 40 हजार कोटींचा करचुकवल्याची नोटीस? कंपनीची थेट उच्च न्यायालयात धाव
सोयाबीन, कापूस, ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न; धनंजय मुंडे जाणार ब्राझीलला!

उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार टीकेची झोड उठली आहे, सनातन धर्माबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले. सनातन धर्माला कोणी उखडून फेकू शकत नाही. सनातन धर्म देशात आणि जगात कायम राहील. एआयडीएमके देखील सनातन धर्माविरोधात होते. आम्ही मजबूतीने सनातन धर्माच्या रक्षणासाठी काम करु, त्याबाबत मोदींनी चिंता करण्याचे कारण नाही. भाजपने सनातन धर्माचा ठेका घेतलेला नाही. इथे शिवसेना बसलेली आहे, आम्ही काम करु, धर्म रक्षणासाठी आम्हाला कोणी अडवू शकत नाही. सनातन हा निवडणुकीचा मुद्दा नसल्याचे देखील राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी