28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबई‘भाजपचे सरकार शिवसेनेने पाडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार देणार’

‘भाजपचे सरकार शिवसेनेने पाडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार देणार’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिले आहे. परंतु संख्याबळाअभावी भाजप सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार देण्याबाबत विचार करेल, अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकातच तसे नमूद केले आहे.

राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. भाजपने सरकार स्थापन केले तर विशिष्ट कालावधीत त्यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करावे लागेल. ‘भाजपची सत्ता स्थापन झाली तर, राष्ट्रवादी काँग्रेस पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर शिवसेनेने (भाजपच्या) त्यांच्या विरोधात मतदान केले आणि सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो’ असे मलिक यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

राज्यपालांनी भाजपच्या बहुमताची खात्री करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

भाजपाला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण

शिवसेनेने अगोदरच भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपने सरकार स्थापन केले तरी शिवसेना विधानसभेत भाजपला बहुमतासाठी सहकार्य करणार नाही. शिवसेनेचे आमदार भाजपविरोधी मतदान करतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर भाजपविरोधीच मतदान करणार आहेत. उरलेल्या सगळ्या अपक्ष आमदारांनी जरी भाजपला मतदान केले तरी सुद्धा भाजप 145 आमदारांचे संख्याबळ दाखवू शकत नाही. त्यामुळे भाजपने सरकार स्थापन केलेच तर ते निश्चितपणे पडेल, अशी अपेक्षा आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला वाटू लागली आहे. मलिक यांच्या प्रसिद्धीपत्रकामुळे आता राष्ट्रवादी (व काँग्रेसच्या) सहकार्याने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येण्याच्या दृष्टीने पाऊले पडू लागली असल्याचे दिसून येत आहे. या तिन्ही पक्षांना आता प्रतिक्षा आहे ती भाजपचे सरकार स्थापन व्हावे व ते लवकर पडावे याची.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी