33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयराज्यात नवे सुधारित रेती धोरण लागू!

राज्यात नवे सुधारित रेती धोरण लागू!

राज्यात स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये (रुपये 133 प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनीज प्रतिष्ठाण निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ.खर्च देखील आकारण्यात येतील. वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नदी पात्रातील वाळू गटाचे निरिक्षण करण्याची कार्यवाही तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळु संनियत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल.

जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकीर, भू-विज्ञान व खनीकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरिल न्यायधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

  • सुधारित रेती धोरणास मान्यता. ग्राहकांना स्वस्त दरात रेती व वाळू उपलब्ध होणार. त्याचप्रमाणे रेती लिलाव बंद.
  • नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता. 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार.
  • देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल.
  • सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण.
  • महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.
  • अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता.
  • नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ‘परिस स्पर्श’ योजना

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदेंना तरुणाने सुनावले, तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे!

भक्तांची चॉईस किती फडतूस; सुषमा अंधारे यांची पोस्ट चर्चेत

‘पन्नास खोके घेऊन किती चोर आले’वाल्यावर गुन्हा दाखल..!

New revised sand policy implemented in the state! Sand policy, Eknath Shinde, A new sand policy

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी