30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्राईम'पन्नास खोके घेऊन किती चोर आले'वाल्यावर गुन्हा दाखल..!

‘पन्नास खोके घेऊन किती चोर आले’वाल्यावर गुन्हा दाखल..!

रॅपर राज मुंगासे यांच्याविरोधात "50 खोके, एकदम ओक्के" या रॅप साँगमुळे FIR; ठाणे शिवाजीनगर पोलिसांत तक्रार, कलम 501, 504 आणि 505 नोंदविले

चोर आले… चोर आले.. एकदम ओके होऊन, पन्नास खोके घेऊन किती चोर आले, अशा आशयाचे रॅप गाणे बनवून शिंदे सरकारची बदनामी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी संबंधित आरोपी राज मुंगासे याला अटक होण्याची शक्यता आहे.

गतवर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर वाद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड पुकारले आणि 40 आमदारांना सोबत घेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. यानंतर राज्यात सत्तांतर झाले. या सर्वच घडामोडींनतर 50 खोके, गद्दार, बंडखोर हे शब्द चांगलेच चर्चेत आले. आरोप-प्रत्यारोपात नेहमी ठाकरे गटाकडून शिंदेगटावर गद्दार, चोर असे आरोप केले जातात. मात्र 50 खोके आणि चोर या शब्दांचा वापर करत एका रॅपरने शिंदे गटावर गाणं तयार केले. हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तद्नंतर या रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटी सदस्य स्नेहल कांबळे ह्यांनी याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून मुंगासे याच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रॅपरने सरकार विरुद्ध बदनामीकारक रॅप केले असल्याचा आरोप कांबळे यांनी तक्रारीत केला आहे. हा रॅपर मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे. याप्रकरणी मुंगासे याला अटक होण्याची शक्यता आहे.

चोर आले पन्नास खोके घेऊन
चोर आले. चोर आले… चोर आले.. एकदम ओके होऊन, कसे बघा चोर आले. पन्नास खोके घेऊन किती चोर आले. एकदम ओके होऊन. अरे छक्क्यांच्या मिशीला ताव बघा, हयांनी पाठीवर दिला आपल्या घाव बघा. गेले सुरत गुवाहट्टी अन् गोवा कसे ढोसली दारू, अन म्हणला हा डाव बघा, अरे पळकुटे चोर झाले, छातीमध्ये छप्पन चोरलास छप्पन चोरलास पक्ष हयांनी चोरतील बाप पण आळया पडुन पडतील हा महाराष्ट्राचा श्राप आहे. मराठी माणुस हा संगळ्यांचा बाप आहे. चोर आले पन्नास खोके घेऊन किती बघा चोर आले. एकदम ओक होऊन कसे बघा चर आले. आपले प्रकल्प पळवतो गुजरातला हया साल्यांनी, महाराष्ट्र विकला या भडव्या दलालांनी सत्तेसाठी हे झुकले, हे दिलीला जाऊन शिवरायांचे वाघ आईघाल्यांनी जाळु यांची लंका, दाऊ यांना इंगा.. भोगा कर्माची फळे.. हयांनी घेतला आहे पंगा, खुप फिरले झाड़ी डोंगर दावु हयांना ठेंगा, मराठी पुष्प स्वराज्य झुकने नही दूंगा चोर आल. पन्नास खोके घेऊन किती बघा चोर आले. एकदम ओके’ होऊन कसे बघा चोर आले. एकदम ओके होवुन.

सरकारविरोधात आक्षेपार्ह बदनामीकारक रॅप बनवून तो सोशल मिडीयावर टाकून शिवसेना व भाजप युती सरकारची बदनामी केली. म्हणुन राज मुंगासे या तरूणाविरोधात फिर्याद देण्यास पोलीस ठाण्यात आलो आहे, असे माहिती स्नेहल कांबळे यांनी दिली.

50 Khoke Ekdam Ok Rap song case filed against Raj Mungase, 50 Khoke Ekdam Ok, Raj Mungose

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी