28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमकेरळ ट्रेनला आग लावणाऱ्या माथेफिरुला एटीएसने केली अटक

केरळ ट्रेनला आग लावणाऱ्या माथेफिरुला एटीएसने केली अटक

केरळ येथे ट्रेनला आग लावणाऱ्या शाहरुख सैफी याला महाराष्ट्र एटीएस च्याअधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याला अटक करून केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं संयुक्त कारवाई करत शाहरुख सैफीला अटक केली आहे. केरळमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेत प्रवाशाला जिवंत पेटवून दिल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये एक घटना घडली होती. कालीकत येथे ट्रेन थांबल्यावर ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लावण्यात आली होती. या आगीत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेनला आग लावल्याचा प्रकार आल्याने याबाबत कालीकत पोलीस स्टेशन येथे आयपीसी 307, 326(अ), 436, 438 त्याच प्रमाणाने रेल्वे ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित सविस्तर वृत्त: 

सीट पकडण्याच्या वादावरून थेट चालत्या रेल्वेचा डब्बाच दिला पेटवून; माय-लेकरासह तिघे होरपळून दगावले

केरळ ट्रेनला आग लावणाऱ्या माथेफिरुला एटीएसने केली अटक
सदर घटनेनंतर आरोपी शाहरुख सैफी हा रत्नागिरीत लपून बसला होता. त्याचप्रमाणे हा अर्ध भाजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला आहे.

ट्रेनला आग लावली असल्याने हा गंभीर मानला जातो. त्यामुळे याचा तपास एटीएस करत असतात. महाराष्ट्र राज्याचे एटीएस चे अधिकारी सतर्क झाले होते. तपास करत होते. ही आग शाहरूख सैफी या तरुणाने लावली होती. त्याने हा घातपात का केला याचा तपास सुरू होता. तसंच घातपातचा प्रकार असल्याने अनेक राज्याचे एटीएस अधिकारी तपास करत होते. महाराष्ट्र राज्याचे एटीएस ही तपास करत होते. या काळात शाहरुख हा रत्नागिरी येथे येऊन उपचार करत असल्याची माहिती महाराष्ट्र एसटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र एसटीएसचे त्याच्या मागावर होते. अधिकारी रत्नागिरी जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोहचले मात्र, पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वी तो निघून गेला होता. यानंतर परत त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी तो रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याला गाठून अटक केलीं. यानंतर त्याला केरळ पोलीस यांच्या ताब्यात दिल आहे.

हे सुद्धा वाचा:

उत्तरप्रदेशच्या 3 चोरट्यांनी 19 वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये तुंबळ हाणामारी; वाद चव्हाट्यावर

‘पन्नास खोके घेऊन किती चोर आले’वाल्यावर गुन्हा दाखल..!

Kerala train attacker Shah Rukh Saifi has been arrested by ATS

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी