33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमंत्रालयशेतकऱ्यांसाठी खुशखबर : सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती

बुधवार 5 एप्रिल 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय; शेतक-यांना मदत करण्याकरिता शिंदे-फडणवीस सरकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; याशिवाय, अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरली जाणार आहे. बुधवार 5 एप्रिल 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतक-यांना मदत करण्याकरिता शिंदे-फडणवीस सरकारचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे. याशिवाय, अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय (कॅबिनेट डिसीजन) संक्षेपात पुढीलप्रमाणे –

मदत व पुनर्वसन

  • शेतक-यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित

महसूल विभाग

  • ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद
  • सेलर इन्स्टीट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण

 नगर विकास-1 

  • नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता. 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
  • देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये

  • अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निर्माण करणार

उच्च व तंत्र शिक्षण

  • नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना
  • अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

हे सुद्धा वाचा : 

मंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत

दिलासादायक: राज्यात अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेताचे पंचनामे होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात पाहाणी दौरा?

ऊर्जा

Good News for Farmers, Natural Disaster, Cabinet Decision, Continuous Rain, Mantrimandal Nirnay

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी