31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनिलेश राणे यांनी घेतला राजकीय संन्यास !

निलेश राणे यांनी घेतला राजकीय संन्यास !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुुत्र, माजी खासदार आणि आमदार नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी अचानक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाने खुद्द नारायण राणे आणि नितेश राणे यांनाही धक्का बसला आहे. असे काय घडले की, निलेश राणे एवढा मोठा निर्णय घेण्याची वेळी आली? आज सकाळी निलेश राणे यांनी ट्वीट करत त्यांचा निर्णय जाहीर केला आणि राजकीय चर्चेला उधाण आले. त्यावेळी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहे. पण या निर्णयावर येईपर्यंत निलेश राणे यांची कुणाची चर्चा केली होती का, पक्ष नेतृत्वाला काही कळवले होते का, याबाबत सध्या तरी काही माहिती उपलब्ध नाही.

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, असे ट्वीट माजी खासदार निलेश राणे करून आज सर्वांनाच धक्का दिला आहे. आता राजकारणात मन रमत नाही, असे कारण देत निलेश राणे यांनी सक्रिया राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे. कुठलीही चर्चा नसताना अचानक निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक २०१४ आणि २०१९ ची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक निलेश राणे हरले होते. नारायण राणेंसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही निलेश राणे यांच्यावर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. त्यांचे बंधू नितेश राणे भाजपचे आमदार असून ते राजकारणात प्रचंड सक्रिय आहेत.

निलेश राणे यांनी काय ट्विट केले आहे, पाहा.

नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे. पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

हे ही वाचा

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भिडणार; सभेचं सोनं कोण लुटणार?

ललित पाटील प्रकरणाला मोठे वळण; गिरणा नदीपत्रात मिळाले 100 कोटींचे ड्रग्ज

बेवडे वाढवण्याचे धोरण, गल्ला भरण्यासाठी सरकारची समिती

दाढीचे काय करणार?

निलेश राणे २००९ मध्ये वयाच्या २८व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी हरवले होते. हा पराभव निलेश राणेंच्या इतका जिव्हारी लागला होता की २०१७ मध्ये त्यांनी जोपर्यंत विनायक राऊत यांचा पराभव करत नाही तोपर्यंत दाढी न करण्याचा निर्धार केला होता. दुर्दैवाने २०१९ मध्येही त्यांना विनायक राऊत यांनी पराभूत केले होते.

दरम्यान, यानंतर निलेश राणे काय करणार, हे अजून त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तरीही त्यांनी राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भात भाजपच्या कुठल्याही नेत्याने दुपारपर्यंत ट्वीट केलेले नव्हते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी