28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भिडणार; सभेचं सोनं कोण लुटणार?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भिडणार; सभेचं सोनं कोण लुटणार?

राज्यात काही दिवसांपासून दसरा मेळाव्याच्या चर्चेला उधाण येत होते. काही दिवसांपासून ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर होणार की अजून कुठे? तर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? यावरून दोन्ही गटात हमरातुमरी सुरू होती. मात्र दोन्ही गटाला आपापले विचार मांडण्याचे वैचारीक व्यासपीठ मिळाले आहे. या व्यासपीठावरून दोन्ही नेते काय बोलतील? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हा मेळावा राज्यातील ऐतिहासिक मेळावा असून नेमक्या कोणत्या दसरा मेळाव्याला कीती गर्दी होणार? दोन्ही गटातील शिवसेना आपापल्या धनुष्यातून टीकेचे बाण सोडणार? हे पाहणे उत्कंठावर्धक असणार आहे.

या मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून जय्यत तयारी होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या सभेसाठी धाराशिवमधून काही शिवसैनिक आले आहेत, अशी माहीती माध्यमांद्वारे समोर येत आहे. तर या सभा आगामी निवडणुकांचा वेध घेणाऱ्या असून मुंबईतील ठिकठिकाणी बॅनरबाजी पहायला मिळते. शिंदेंचा दसरा मेळावा जरी आझाद मैदानावर होणार असला तरीही मुंबई महानगरपालिकेच्या भोवताली एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भोवताली शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंच्या फोटोची बॅनरबाजी करण्याचे कारण समोर आले आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाने अप्रत्यक्षरीत्या ठाकरे गटाला आव्हान दिले असल्याची चर्चा आहे. सभा सुरू होण्याआधी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

हे ही वाचा

ललित पाटील प्रकरणाला मोठे वळण; गिरणा नदीपत्रात मिळाले 100 कोटींचे ड्रग्ज

जाणून घ्या विजयादशमीचे महत्व!

बेवडे वाढवण्याचे धोरण, गल्ला भरण्यासाठी सरकारची समिती

दरम्यान, या सभेसाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरू आहे. सकाळपासून आझाद मैदानावर या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोकं जमू लागली आहेत. एवढेच नाही तर दसरा मेळावा सुरू होण्याआधी उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा म्हणजे शिमगा अशी टीका एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाच्या मेळव्यावरुन केली आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी शिंदे गटाच्या बॅनरबाजीवर हे लोकं ड्युप्लिकेट आहेत. हा मेळावा ड्युप्लिकेट असे भाष्य करत एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले आहेत.

कोण गर्दी खेचणार?

मागील वर्षी शिंदे गटाने बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याची सभा घेतली होती. यावेळी या सभासाठी काही लोकांना आपण या ठिकाणी आलो कशाला? हे माहीत नव्हते. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना काही लोकं उत्तर देत नव्हती. तर रात्री अनेक खुर्च्या रिकाम्या असणारे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले होते. तर यंदा शिंदे गटाच्या दसरा मेळावा आझाद मैदानावर कीती गर्दी खेचून आणेल हे पाहणे गरजेचे आहे. तर ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा अनेक वर्षांपासून होत असून आता घोडेमैदान फार लांब नाही. यामुळे सभेचं सोणं कोण लुटणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी