33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयगोपीचंद पडळकर स्वत:च्याच सरकारवर नाराज, उपोषणाची केली घोषणा

गोपीचंद पडळकर स्वत:च्याच सरकारवर नाराज, उपोषणाची केली घोषणा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच कोणत्यानं कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. अनेकदा पडळकरांनी विरोधकांवर टीका केल्या आहेत. देशाच्या राजकारणात अनुभवी राजकीय नेते शरद पवारांवर टीका करायला मागे पुढे पाहतात. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शरद पवारांवर टीका करताना विचार करतात. मात्र गोपीचंद पडळकर हे शरद पवारांवर टीका करताना पाहीले असेलच, यामुळे ते आधिक चर्चेत होते. तर धनगर समाजाच्या आरक्षणाबाबात ते अधिक चर्चेत पहायला मिळत आहेत. मात्र आता ते एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. यामुळे पडळकरांनी आपल्याच सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाचे विविध प्रश्न अनेक महिने, वर्षे झाले सुटत नाहीत. यामुळे याचा त्रास हा एसटी कर्मचाऱ्यांना होत आहे. यासाठी आता गोपीचंद पडळकरांनी सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यसरकार सरकारी नोकरदारांना ज्या सुविधा देते, त्याच सोईसुविधा आता एसटी महामंडळातील नोकरदारांना मिळाव्यात, अशी अपेक्षा आता गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली आहे. २४० दिवसाची लिपीक पदाची अट रद्द करण्याबााबत सरकारकडे मागणी केली आहे. याबाबत त्यांनी उद्या ११ वाजता आंदोलन करणार असल्याची माहीती सांगितली आहे.

हे ही वाचा

निलेश राणेंनी एवढा मोठा निर्णय का घेतला?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भिडणार; सभेचं सोनं कोण लुटणार?

ललित पाटील प्रकरणाला मोठे वळण; गिरणा नदीपत्रात मिळाले 100 कोटींचे ड्रग्ज

 काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

एसटी महामंडळाच्या नोकरदारांच्या विविध प्रश्नांसाठी उद्या ११ वाजण्याच्या सुमारास आंदोलन करणार आहे. हे आंदोलन सेवाशक्ती संघर्षच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी घेण्यात येणार आहे. इलेक्ट्रीक बस सरकार घेणार असून त्या खासगी नसाव्यात त्या सरकारी असाव्यात. एसटी कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेमच्या सोईसुविधा मिळाव्यात, असे पडळकर म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी पडळकरांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यात सरकारी नोकरदार वर्गाला ज्या सोईसुविधा आहेत, त्याच सुविधा आता एसटी महामंडळातील कर्मऱ्यांसाठी असाव्यात.

सरकारने १५४० इलेक्ट्रॉनिक्स बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत. सरकारी इलेक्ट्रीक बसचा वापर करावा, खासगी बसचा वापर करु नये.

कॅशलेश मेडिक्लेमबाबत एसटी कर्मचारी मागणी करत आहेत. त्याबाबत त्यांच्या मागण्या राज्यसरकारने पुर्ण कराव्यात.

एसटी संप काळातील वेतन राज्यसरकारने कर्मचाऱ्यांना द्यावे. अशा काही मागण्या राज्यसरकारने पुर्ण कराव्यात.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी