30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रहोर्डिंगने घेतला पाच जणांचा बळी; पिंपरी-चिंचवड शहरात दुर्घटना

होर्डिंगने घेतला पाच जणांचा बळी; पिंपरी-चिंचवड शहरात दुर्घटना

वादळी पावसामुळे आडोसा म्हणून होर्डिंगचा आसरा घेतलेल्या पाच जणांचा होर्डिंग कोसळून मृत्यू झाला आहे. पाच मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथे कात्रज- देहुरोड सर्व्हिसरोडवर घडली.
घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णवाहिका, अग्निशमनदल देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच घटनास्थळी क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, अनेक ठिकाणी गारांचा पाऊस होऊन मोठे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात देखील वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात वादळी पावसाने हौदोस घातला. पावसाच्या माऱ्यातून वाचण्यासाठी काही लोकांनी होर्डिंगचा आडोसा घेतला मात्र, त्याच होर्डिंगने त्यांचा बळी घेतला.

हे सुद्धा वाचा

सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिका कार्यालयासमोर विकले कांदे-बटाटे

खुनाचा गुन्हा असला तरी, दुष्मनी नव्हती; न्यायालयाने आरोपीला चार वर्षांची शिक्षा ठोठावली

समलिंगी विवाह म्हणजे शहरी उच्चभ्रू वर्गाचे विचार; समलिंगी विवाहला सर्वोच्च न्यायालयाचा विरोध!

पिंपरी चिंचवड परिसरात वादळी पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. किवळे येथे कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर काही प्रवासी पंक्चरच्या दुकानाजवळ थांबले होते. मात्र जोरदार वाऱ्यामुळे अचानक भले मोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी