33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयदिवाळीत राजकीय धमाका, शिंदे गटाच्या नेत्याकडून मोठा दावा

दिवाळीत राजकीय धमाका, शिंदे गटाच्या नेत्याकडून मोठा दावा

दिवाळीत फटके वाजतातच. पण यावेळी राजकीय फटाके वाजणार आहेत, याचे सुतोवाच शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्याने केले आहेत. आणि या मंत्र्याने बोट शरद पवार यांच्या गटाकडे दाखवले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत पवार गटात मोठी फूट पडेल, याचे संकेत आहेत. पण ही फूट कशी असेल, कोण कुठे जाणार, हे पत्ते या नेत्याने अजून उघडे केलेले नाहीत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात मोठा भूंकप होईल, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत वर्तवले आहे. आता या दोन्ही परस्पर विरोधी गटांच्या नेत्यांनी भाकिते केल्यामुळे खरेच काही घडणार की राजकीय चर्चेसाठी पुडी सोडून दिली, हे लवकरच स्पष्ट होईल.

उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. म्हणूनच त्यांना साताऱ्यासोबत ठाण्याच्याही पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. म्हणूनच शंभूराज देसाईंनी दसरा-दिवाळीत धमाका होईल, असे भाकीत केल्यामुळे पडद्यामागे काहीतरी नक्कीच घडत असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाचे अनेक नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात आहेत. हे नेते महायुतीमध्ये येण्यास इच्छूक आहेत. याबाबत त्यांची शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीत मोठा धमाका होईल, असा दावा शंभूराज देसाईंनी केला आहे.

दरम्यान, इकडे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीदेखील मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फूट पडेल, असा दावा करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत मोठा भूंकप होईल. शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या १३ खासदार असून त्यापैकी केवळ तिघांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल. साधारणता फेब्रुवारीमध्ये हे चित्र स्पष्ट होईल, असा दावाही खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा

गर्व से कहो हम हिंदू हैं, म्हणणारी शिवसेना आता.. डॉ. आशिष शेलारांचे ट्वीट

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण?- नाना पटोले

…तर ओबीसी रस्त्यावर उतरतील; ओबीसी नेते शेंडगे यांचा इशारा

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांकडून असे वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. वास्तविक असे दावे यापूर्वीही करण्यात आले होते. पण आता पाच राज्यांच्या विधानसभांची निवडणूक जाहीर झालेली आहे. एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी हे चित्रही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता फाटाफुटीला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि पक्षाचे चिन्ह कुणाला द्यायचे, याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. अशातच पुन्हा फाटाफूट झाली तर ती कुणाच्या पथ्थ्यावर पडेल आणि कोणत्या पक्षाचे नुकसान होऊ शकेल, याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी