28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रयेरवडा भूखंडाचे प्रकरण अजित पवारांना शेकणार? मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

येरवडा भूखंडाचे प्रकरण अजित पवारांना शेकणार? मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील नव्या आरोपाने ते संकटात सापडले आहेत. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या आरोपामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, अजित पवारांवर आरोप झाल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी थेट मीरा बोरवणकर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याची भाषा केली आहे. पुण्यातील येरवडा तुरुगाच्या या भूखंड प्रकरणात झालेला आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावला असला तरी पुढील निवडणूक आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अजित पवारांनी किती त्रासदायक ठरेल, हे लवकरच स्पष्ट होईल. तत्पूर्वी मीरा बोरवणकर आता कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अजित पवार यापूर्वीच अडचणीत आले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भातील जाहीर आरोप केल्यानंतर काही दिवसांतच अजित पवार महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्यात कुठलाही आरोप झालेला नाही. त्यापूर्वी भाजपच्या नेत्यांकडून सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना जेलमध्ये पाठवणार असल्याची वक्तव्ये केली जात होती. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सिंचन घोटाळ्यावर भाजप नेत्यांनी मौन बाळगळे आहे.

निवृत्त पोलीस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘कमिशनर मॅडम’ या पुस्तकातून पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. येरवडा पोलीस ठाण्याजवळील पोलिसांसाठीचा भूखंड राजकीय व्यक्तींनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप आहे. या संदर्भात आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालयातून निरोप मिळाल्यानंतर आपण तत्कालीन पालकमंत्र्यांची भेट घेतली, असा दावा मीरा बोरवणकर यांनी ‘कमिशनर मॅडम’ या पुस्तकातून केला आहे. यात त्यांनी कुठेही अजित पवार यांचे नाव घेतलेले नाही. पण प्रकरण २०१० मधील असून त्यावेळी अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

विभागीय आयुक्तांच्या निरोपानंतर आपण पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे येरवडा पोलीस ठाणे परिसराचा नकाशा होता. या पोलीस ठाण्याजवळील तीन एकर जागेचा लिलाव झालेला असून जास्त बोली लावणाऱ्याला जमीन हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करायची आहे, असे त्यांनी मला सांगितले. याला आपण विरोध केला. त्यानंतरही त्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरल्यानंतर आपण नकार देत नकाशा भिरकावून दिला, असा दावा मीरा बोरवणकर यांनी पुस्तकातून केला आहे. माझ्या नकाराच्या निर्धारानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही या प्रकरणात आपण मदत करू शकणार नाही. असे म्हटल्याचा दावा या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

सत्यपाल सिंह गेले, बोरवणकर आल्या, प्रस्ताव रेंगाळला

तीन एकराचा भूखंड डीबी रियल्टी या शाहीद बलवा यांच्या कंपनीला देण्याचा प्रस्ताव तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिला होता. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला होता. पण या प्रस्ताव तयार झाल्यानंतर सत्यपाल सिंह यांची बदली झाली आणि त्या जागी मीरा बोरवणकर आल्या. आणि हा प्रस्ताव रेंगाळला.

काय म्हणाले दिलीप बंड?

विभागीच आयुक्त असताना गृहखात्याने असा प्रस्ताव तयार केला होता. येरवडा पोलीस हद्दीच्या आसपासची जागा ही एका बिल्डरची होती, त्यांना पोलिस हद्दीतील ती जमीन हवी होती. त्यावेळी पोलिसांसाठी घरे बांधण्याचा पीपीपी प्रस्ताव करण्यात आला होता. यात अजित पवारांचा काही संबंध नाही.

उच्चस्तरीय चौकशी व्हावी – विजय वडेट्टीवार

आता हे प्रकरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अजित पवारांवर झालेला हा काही पहिलाच आरोप नाही, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

…अन्यथा मानहानीचा खटला दाखल करू! – रुपाली चाकणकर

मीरा बोरवणकर यांच्या आरोपानंतर अजित पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. मीरा बोरवणकर यांनी पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करू, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. तर मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी वेगळाच आहे आणि पुस्तकाच्या खपासाठी बिनबुडाचा आरोप केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

हे ही वाचा

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण?- नाना पटोले

टोलच्या नथीने सरकारचा ठाकरे सेनेवर हल्ला

‘समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका,’ प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका

अन् भर कार्यक्रमात निकने प्रियंकासमोरच ‘हिला’ केले किस

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी