31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमी काय कुंद्रा आहे का?; असे का म्हणाले राज ठाकरे

मी काय कुंद्रा आहे का?; असे का म्हणाले राज ठाकरे

टीम लय भारी

पुणे:- येत्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यात 9 मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. राज ठाकरे पुण्यातील मनसे कार्यालयात पोहोचले. त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरामॅन त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. कॅमेराचा आवाज आणि फ्लॅशमुळे राज ठाकरे काहीसे वैतागल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांनी मी काय कुंद्रा आहे का? असा सवाल या कॅमेरामॅनला केला (Raj Thackeray said, What am I Kakundra?).

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा

राज कुंद्राच्या समस्या आणखी वाढणार; मुंबई गुन्हे शाखेच्या हाती तब्बल 120 नवे अश्लील व्हिडिओ

राज ठाकरे मनसे कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरामॅननी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी सगळं झालं? कान, नाक, घसा, केस? किती वेळा तेच तेच घेता रे. मी काय कुंद्रा आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या प्रश्नावर उपस्थित माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामॅनमध्ये हसू लागेल. स्वत: राज ठाकरेही यावेळी हसले.  राज ठाकरे यांनी माध्यमांच्या कॅमेरामनला केलेल्या या प्रश्नाची जोरदार चर्चा होत आहे (Raj Thackeray by This question posed to the media cameraman is being hotly debated).

Raj Thackeray said, What am I Kakundra?
राज ठाकरे

राज ठाकरेंनी चिमुकल्या चाहत्याचे लाड पुरवले

राज ठाकरेंचे फक्त राजकारणातच नाही तर सर्व वयोगटात चाहते आहेत. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंची एक चिमुकला चाहता दिसून आला. राज ठाकरे यांनी या चिमुकल्या चाहत्याला ऑटोग्राफ दिला. नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवून राज ठाकरे यांनी वहीवर ऑटोग्राफ दिला. यावेळी उपस्थित सर्वजण अचंबित झाले.

महाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; ‘या’ प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरणार

“I Am Not Raj Kundra To Give A Shot”, Says Raj Thackeray As He Makes Fun Of Shilpa Shetty’s Husband

राज ठाकरेंच्या पुण्यातील दौऱ्यात या चिमुरड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे बघायला मिळाले. कारण तिसरीत शिकणारा सोहम जगताप आईशी भांडून राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घ्यायला आला होता. राज यांनीही मग खुल्या दिल्याने या चिमुकल्या चाहत्याचे लाड पुरवले. मी राज ठाकरेंना म्हटले, ऑटोग्राफ द्या, त्यांनी मग देतो म्हणाले. मला ते आवडतात म्हणून मी त्यांची ऑटोग्राफ घेतली, असे सोहमने सांगितले (Raj Thackeray pampered Chimukalya fans).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी