30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
HomeमुंबईBig Breaking : आमदार रामराव वडकुतेंचा राष्ट्रवादीला रामराम, मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश

Big Breaking : आमदार रामराव वडकुतेंचा राष्ट्रवादीला रामराम, मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विधानपरिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगशारदा सभागृहात हा प्रवेश सोहळा होणार आहे.

वडकुते यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रत्यक्ष भेटून आमदारकीचा राजीनामा दिला. नाईक निंबाळकर यांनीही तो मंजूर केला असल्याचे वडकुते यांनी ‘लय भारी न्यूज नेटवर्क’शी बोलताना सांगितले.

आपल्या नाराजीविषयी वडकुते यांनी सांगितले की, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कम भूमिका घ्यावी असा माझा आग्रह होता. पण हा पक्ष धनगर आरक्षणावर मुळमुळीत भूमिका घेत आहे. राष्ट्रवादीमध्ये मराठ्यांचेच वर्चस्व आहे. बहुजनांना थारा नाही. दुसऱ्या बाजूला भाजपने धनगरांच्या बाबतीत चांगल्या योजना लागू केल्या आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या आदिवासींच्या योजना भाजपने धनगर समाजाला लागू केल्या आहेत. आरक्षणाबाबतही भाजपने न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजासाठी काहीही केलेले नाही. या उलट भाजप धनगर समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे, व भाजपमध्ये प्रवेश करीत आहे, असे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी