30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो : रावसाहेब...

मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो : रावसाहेब दानवे

टीम लय भारी

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त दानवेंनी औरंगाबाद येथे भाषण दिले होते. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो असे म्हटले (Raosaheb Danve slammed Chief Minister Uddhav Thackeray).

दानवे यांनी नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीशी उभे राहण्याची विनंती केली. याच कारणामुळे दानवेंनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, पुढचं मी बघतो असे म्हटले.

भाजप धरणी ठेकेदाराचा १३ लाखाचा सभागृह घोटाळा उघडकीस

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या भन्नाट शुभेच्छा

दानवेंच्या या विधानावर मुख्यमंत्र्यांनी ही लगेच प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन सुरु होणार असेल तर, मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे हे दोघेही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एकाच मंचावर उपस्थित होते.

अबलांसाठी सबलीकरण योजना व विशेष कृती आखाडा, पोलिसांसमवेत महानगरपालिकेचा पुढाकार

Raosaheb Danve visits WR HQ, discusses bullet train project

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्धाटन पार पडले. यावेळी रावसाहेब दानवेंसोबतच पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी