33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्ला; चित्रा वाघ यांचे त्यावर प्रत्युत्तर

संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्ला; चित्रा वाघ यांचे त्यावर प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई:- पेगासस प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापत असल्याचे दिसून येत आहे. पेगास प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नागरिकांच्या स्वातंत्र्याचे हनन केले जात असल्याचे म्हणत हे कुणी केले आहे, याचे उत्तर देशाला मिळाले पाहिजे, असे राऊत म्हणाले. एकंदरित केंद्र सरकारवर संतापलेल्या राऊतांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या पेगासस प्रकरणाची चिंता करण्यापेक्षा पेग्विंनची चिंता करा म्हणत प्रत्युत्तर दिले आहे (Sanjay Raut attacks Modi government from Pegasus Chitra Wagh reply).

आजच्या सामना अग्रलेखातून पेगसासच्या प्रकरणावर भाष्य करणारा रोखठोक अग्रलेख लिहित संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांचा पुन्हा एकदा ‘या’ प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल, पण….

आज ज्या युवराजांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळं ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त 0.5 टक्के दंड आकारला गेला, का आणि कोणासाठी?, असा सवाल करत संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा, असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय लिहिले आहे

पेगासस प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. ‘पेगासास’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगासस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसले असते, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.

Sanjay Raut attacks Modi government Chitra Wagh reply
चित्रा वाघ आणि संजय राऊत

मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त काही अपेक्षा…

Sanjay Raut for Uddhav Thackeray as PM

‘पेगासस’ प्रकरण सरकारला गंभीर वाटत नाही

‘पेगासस’ हेरगिरी प्रकरणात संसदेतला गोंधळ थांबायला तयार नाही. विरोधकांना हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी हवी आहे. संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशी करा, अशी विरोधकांची मागणी आहे व सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्षच केले आहे. निदान न्यायालयीन चौकशी तरी करा हे त्यांचे मागणेही मान्य होत नाही. दोन केंद्रीय मंत्री, काही खासदार, सर्वोच्च न्यायालय, लष्कराचे अधिकारी व असंख्य पत्रकार यांचे फोन चोरून ऐकले जातात हे प्रकरण सरकारला गंभीर वाटत नाही. हे जरा रहस्यमय वाटत असल्याचे संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut said. The government does not take the issue of phone theft seriously).

पण हा निर्लज्जपणाही आहे

विरोधकांना या प्रश्नी जितके बोंबलायचे ते बोंबलू द्या, अशी बाणेदार भूमिका सरकारने घेतलेली दिसते. विरोधकांवर, पत्रकारांवर, नागरिकांवर पाळत ठेवणे, त्यांच्या खासगी आयुष्यावर अशाप्रकारे अतिक्रमण करणे हा अपराध तर आहेच, पण हा निर्लज्जपणाही आहेच. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा सर्व मामला असला तरी कुणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही, पण आमच्या सरकारची भूमिका याबाबत वेगळी आहे (Sanjay Raut said. The role of our government is different).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी