31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयसंजय राऊत यांची भास्कर जाधवांच्या दमदाटीवर पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांची भास्कर जाधवांच्या दमदाटीवर पहिली प्रतिक्रिया

टीम लय भारी

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.25) चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधवांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्यांच्या चिपळूणमधील दमदाटीवर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणात मात्र संयमी प्रतिक्रिया दिली (Sanjay Raut first reaction to Bhaskar Jadhav push)

भास्कर जाधवांबाबत मी पाहिले नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचले. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी

तळीये गावातील अजूनही 32 नागरिक बेपत्ता; मृतांचा आकडा 53 वर, बचाव कार्य सुरूचं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.25) पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला भास्कर जाधवांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्यावर संजय राऊत यांनी भास्कर जाधवच याबाबत भाष्य करतील असे राऊत यांनी सांगितले (Sanjay Raut said that only Bhaskar Jadhav will comment on this).

महाराष्ट्राला उभे करण्यासाठी मुंबईतील श्रीमंतांनी पुढे यावे

महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत, मोठे नुकसान झाले. अनेकांचे जीव गेले आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत त्या सगळ्यांना आता सावरायचं आहे. महाराष्ट्र सरकारचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut first reaction to Bhaskar Jadhav push
संजय राऊत

तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावे. महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावे उद्ध्वस्त झाली आहेत. त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल. सरकार आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

एकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

Maharashtra के बाढ़ पीड़ितों की मदद करे केंद्र सरकार, Sanjay Raut ने की ये अपील

राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पण ही सगळ्यांची जबाबदारी आहे, महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिले, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती महाराष्ट्राला उभं करायची. राज्याला सहस्त्र हातांनी मदत होणे आवश्यक आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मुंबईचे अनेक जण आहेत. त्यांनी सुद्धा मदत करायला हवी, असे आवाहन संजय राऊत यांनी केले (The rich people of Mumbai should come forward to build Maharashtra).

चिपळूणच्या बाजारपेठेत काल नेमके काय घडले?

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याचवेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथे एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेले, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.

महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होते. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिले. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला बाकी काय तुझा मुलगा कुठे आहे, अरे आईला समजव आईला समजव उद्या ये, असे भास्कर जाधव तावातावाने बोलत होते (What exactly happened in the Chiplun market yesterday)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी