30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीय...तर देशात लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती : राहुल गांधी

…तर देशात लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती : राहुल गांधी

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घाल्यानंतर आता परिस्थिती आटोक्यात येऊ लागली आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करत आहेत. (Congress leader Rahul Gandhi has criticized the Modi government on various issues).

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

महाडाचे कर्तृवान माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी  हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती” असे म्हटले आहे (Congress leader Rahul Gandhi has criticized the Modi government on various issues).

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. ‘कुठे आहे लस?’ असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारला आहे. “देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती” अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. तसेच देशातील कोरोना लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि मीडियातील बातमीचा उल्लेख करत एक व्हिडिओही राहुल यांनी शेअर केला. व्हिडिओमध्ये भारतातील लसीकरणाच्या आकड्यांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. याचा उद्देश कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा आहे. डिसेंबर 2021 पर्यंत दोन्ही डोस देऊन 60 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा तडका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे

‘If you understood country’s Mann Ki Baat…’: Rahul Gandhi takes jibe at PM Modi over vaccine shortage

रोज 93 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची गरज आहे. पण गेल्या सात दिवसांचा लसीकरणाचा सरासरी आकडा हा दिवसाला 36 लाख इतका आहे. यामुळे गेल्या सात दिवसांत 56 लाख डोसचा फरक आहे. 24 जुलैला गेल्या 24 तासांत 23 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. यात 69 लाखांचा फरक होता, असे व्हिडिओत म्हटले आहे. काँग्रेसने मंदावलेली लसीकरण मोहीम आणि सरकारच्या लसीकरण धोरणावर जोरदार टीका केली आहे. तसेच पेगासस स्पायवेअर म्हणजे हेरगिरीवरून ही राहुल गांधींनी ट्वीट केले आहे. “मित्रांचा फायदा आणि विरोधकांची हेरगिरी” असे देखील राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Rahul Gandhi has criticized the Modi government

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे (A hospital in Delhi has claimed this in its report).

कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील मूलचंद रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यात ब्रेन हॅमरेज आणि अनेक गंभीर समस्या वाढत आहेत. डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणे दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचे समोर आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी