30 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसंविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ; पण रोज पायदळी तुडवतात, संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ; पण रोज पायदळी तुडवतात, संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

टीम लय भारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे. मात्र काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे(Sanjay Raut laments constitution)

शिवसेनादेखील या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दरम्यान संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी? अशी विचारणा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

संविधान कार्यक्रमावर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “मी राष्ट्रवादीविषयी सांगत नाही. विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं.

देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”.

कामावर जाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं हित, जे भडकवतायत ते कुटुंब जगवायला येणार नाहीत – संजय राऊत

Shiv Sena-led MVA alliance to stay in power in Maharashtra for 25 years: Sanjay Raut

“हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते ते महत्त्वाचं आहे. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ असून गेल्या काही वर्षांपासून रोज पायाखाली तुडवला जात असून अवहेलना केली जात आहे.

त्यामुळे सरकारने संविधान दिवस पाळण्याचं जे ठरवलं आहे त्यासाठी विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे. आम्हीदेखील सहभागी होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी