30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयसंजय राऊत म्हणाले, ‘बाप बेटे लवकरच जेलमध्ये जाणार

संजय राऊत म्हणाले, ‘बाप बेटे लवकरच जेलमध्ये जाणार

टीम लय भारी

मुंबई: मध्यंतरी भाजप नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत हे एकमेकांवर तुफान घोटाळ्यांचा हल्ला बोल करत होते. संजय राऊत यांनी नुकतीच पार पडलेल्या परिषदेत भाजपा नेते किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या दोघांवर जोरात आरोप केले.( Sanjay Raut said, ‘Baap Bete will go to jail soon)

 त्या आरोपांवर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी आपल्या अटक जामीनीसाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नील सोमय्या अटक टाळण्यासाठी कोर्टात गेले असल्याचे समोर आले आहे. २३ फेब्रुवारीला त्यांनी ही याचिका केली आहे. आणि आज नील सोमय्या यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

सोमय्या यांचे पुत्र नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे. इतकेच नव्हे तर बाप, बेटे लवकरच जेलमध्ये जातील असही संजय राऊत म्हणाले, आणि त्या साठी  कोठडीचं सॅनिटायजेशन सुरु असल्याचंही म्हटलं जातं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपविरोधात लढण्यासाठी रोहित पवारांनी सुचवला हा प्लॅन

नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांने लावला बॅनर; कुछ ही देर की….

भाजपाच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

Daily brief: Sanjay Raut dismisses calls for arrested NCP leader Nawab Malik’s resignation, and all the latest news

किरीट सोमय्या प्रत्युत्तर देत म्हणाले, आम्ही गैरव्यवहार केल्याचे पुरावे असतील तर ठाकरे सरकारने आमच्या विरोधात चौकशी करावी, तर आम्ही न्यायालयात जाऊ. त्याचबरोबर सोमय्या यांनी संजय राऊतांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले होते. “नील वा माझा वाधवानशी संबंध नाही, पीएमसी बँकेशीही संबंध नाही. असे ते म्हणाले आहेत. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, आम्ही घाबरत नाही,” असं सोमय्या म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी