32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयबापासाठी अखेर लेक राजकीय मैदानात उतरली, सूडाबुद्धीतून ही कारवाई होतेय!

बापासाठी अखेर लेक राजकीय मैदानात उतरली, सूडाबुद्धीतून ही कारवाई होतेय!

टीम लय भारी

 मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राजकीय वातावरण थोडे तापले आहे. ही अटक मंजूर नसल्याने कित्येक राष्ट्रवादी नेत्यांनी  या अटकेच्या निषेधार्थ आंदोलनं सुरू केली आहे.(Lake finally entered the political arena for Dad This action is done out of revenge)

आज तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. चेंबूरमध्येही आज जोरदार आंदोलन करण्यात आले असून स्वत: नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या आंदोलनात उतरल्या असून , नवाब मलिक यांच्यावरील कारवाई चुकीची आहे. सूडाबुद्धीतून ही कारवाई होत आहे. आणि मुसलमान म्हणजे दहशतवाद्यांशी संबंध आहेच असं होत नाही. आमचा संबंध दहशतवाद्यांशी किंवा दहशतवादी संघटनांशी लावला जाईल याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता.

पण यातून कुठे तरी दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा भाजपचा सखोल प्रयत्न दिसून येत आहे. भाजपचं हे राजकारण योग्य नाही, असंही सना मलिक यांनी म्हटलं आहे. चेंबूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनं करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांने लावला बॅनर; कुछ ही देर की….

भाजपविरोधात लढण्यासाठी रोहित पवारांनी सुचवला हा प्लॅन

संजय राऊत म्हणाले, ‘बाप बेटे लवकरच जेलमध्ये जाणार

Nawab Malik ‘a fighter’: Minister’s family extends support

 माझे वडील तपास संस्थांच्या विरोधात बोलत होते म्हणून त्यांच्यावर कारवाई केली अशी माझी भावना देखील सना मलिक हिने व्यक्त केली आहे.राजीनाम्याबाबत विचारले असता, त्यांनी राजीनामा द्यावा असं मला तरी वाटत नाही. त्यांनी राजीनामा देण्याची गरज आहे असं वाटत नाही. आणि मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असा निर्णय महाविकास आघाडी म्हणून सर्व नेत्यांनी घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी