34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयभाजपाने उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नये, संजय राऊतांचा इशारा

भाजपाने उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नये, संजय राऊतांचा इशारा

टीम लय भारी

मुंबई: भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी असा वाद पेटला आहे. मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपासह बजरंग दलाने विरोध केला आहे. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील तज्ज्ञ कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही,” असा सूचकवजा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला.(Sanjay Raut warns BJP not to mess with history here)

 मुंबईत काय करायचं त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार समर्थ आहे. काळजी कऱण्याचं कारण नाही. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नका,असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत म्हणाले, हीच मनोहरभाईंना खरी श्रद्धांजली ठरेल!

खासदार संजय राऊत यांचे भाजपला खुले आव्हान

भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली त्या सर्वाचं चारित्र्य प्रमाणपत्र माझ्याकडे : संजय राऊत

Shiv Sena’s Sanjay Raut Deletes Tweet After BJP MP Calls It ‘Unmanly’

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भाजपाने या क्रीडा संकुलासमोर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपा नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “मग सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचं गुणगाण गात गौरव केला होता. योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी भाजपाने त्यांचा राजीनामा घ्यावा”.

टिपू सुलतानचं काय करायचं ते सरकार पाहून घेईल. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही. तुम्ही कशाप्रकारे इतिहास लिहिताय, बदलताय अगदी दिल्लीत कसा नव्याने इतिहास लिहायला घेतला आहे हे आम्हाला माहिती आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हा सगळा इतिहास आम्हाला सांगण्याची गरज नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी