33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeराजकीयगिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर सणसणीत टीका

गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर सणसणीत टीका

टीम लय भारी

जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा झटका बसला आहे. कारण नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. त्यामुळे खडसे यांचा स्वत:च्या होमग्राउंडमध्ये पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला(Girish Mahajan’s scathing criticism on Eknath Khadse).

खरंतर महाजन आणि खडसे यांच्यात नेहमीच वादावाद सुरु असतो. यावेळी गिरीश महाजन यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन खडसेंना टोला लगावला आहे. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमग्राउंडवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली.शेवटी ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

बोदवडमध्ये ते हरले आता कारण कशाला सांगता? मोठ्या मनाने सांगाना, आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही. त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काहीही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची असा प्रकार खडसेंचा सुरु आहे”, असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपात काम केलं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना भाजपने संधी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन यांची आर्थिक नाकाबंदी!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर जहरी टीका

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसमध्ये फूट, स्टार प्रचारक भाजपात

BJP Opposes ‘Naming’ Of Mumbai Garden After Tipu Sultan, Says He’s Known For Committing Atrocities Against Hindus

दरम्यान भाजपा नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली असून ज्याच्याच दम असतो तो निवडून येतो असं म्हटलं आहे. “बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले; खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये हारले तर आता कारणं कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची असा प्रकार खडसे यांचा सुरू,” असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

“शिवसेनेला यूपीमध्ये कितीही जागा लढवू द्या. मागच्या वेळेस त्यांचं डिपॉझिट गेलं होतं. शिवसेनाही आता देश काबीज करायला लागली आहे. त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे. राज्यामध्ये 55 आमदारांच्या भरोशावर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

“महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. अर्धा डझन मंत्री चौकशीच्या फेऱ्यात असून ते जेलमध्ये आहेत. शिवसेना पक्ष सगळीकडे उमेदवार उभा करतो आणि डिपॉझिट गमावून बसतो यात काय पुरुषार्थ आहे?”, असा खोचक सवाल देखील गिरीश महाजन यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी