29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजसर्वोच्च न्यायालयाचा नितेश राणेंना दणका

सर्वोच्च न्यायालयाचा नितेश राणेंना दणका

टीम लय भारी

नवी दिल्ली : सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणुकीत संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याचप्रमाणे नितेश राणेंना येत्या दहा दिवसात पोलिसांसमोर शरण येण्यास सांगितले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे(Supreme Court rejects Nitesh Rane’s pre-arrest bail).

दरम्यान नितेश राणे बुधवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सलग तिसऱ्या दिवशी नितेश राणेंनी कणकवली पोलीस स्थानकात हजेरी लावली. यावेळी १५ मिनिटं नितेश राणेंची चौकशी करण्यात आली. पोलिसांना तपासात लागेल ते सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचं नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तसंच ही घटना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी खिल्ली उडवण्यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी उच्च न्यायालयात केला होता.

हे सुद्धा वाचा 

मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

शिवसेनचा धक्का, नितेश राणेंच्या हातून देवगडमधून गेली सत्ता

स्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती… : नितेश राणे

Supreme Court Asks BJP MLA Nitesh Rane To Surrender In Attempt To Murder Case; Grants Protection From Arrest For 10 Days

विधिमंडळाबाहेर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात आहे. तसेच खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा नितेश यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेत केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी