35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी, आरोपींना अटक का नाही?, सरकार...

11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी, आरोपींना अटक का नाही?, सरकार कुणाला वाचवतंय?

टीम लय भारी

मुंबई: येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणारा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत हे दाखवून देण्यासाठी आहे. तसेच लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे, असा संतप्त सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे (Sanjay Raut’s question to the central government).

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. लाखीमपूर खिरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. त्याची सर्वोच्च न्यायालयाने स्यूमोटोद्वारे दखल घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. जे यात मृत झाले त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकार कोणती माहिती लपवत आहे. आरोपींची नाव ओळख निष्पन्न झाली आहेत तरी त्यांना का अटक केल्या जात नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

शेतकऱ्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा

या घटनेत शेतकरी मारले गेले आहेत. तरीही सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. सरकार कुणाला वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे? असा सवाल त्यांनी केला. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठीच हा बंद पुकारण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे देशाला दाखवून देऊ, असंही ते म्हणाले.

MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल

Shiv Sena MP Sanjay Raut to meet Rahul Gandhi in Delhi

हे तर महाविकास आघाडीचं यश

यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कालचा निकाल हे महाविकास आघाडीचं यश आहे. कुणाला किती जागा मिळाल्या हा ज्याचा त्याचा गणित मांडण्याचा प्रश्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचा बंद

दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी काल सांगितलं होतं. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी, आरोपींना अटक का नाही?, सरकार कुणाला वाचवतंय?

उत्तर प्रदेशात लखीमपूरला जी घटना घडली शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची. त्याचा निषेध 11 तारखेला केला जाणार आहे. आज मंत्रिमंडळातही याबाबत सर्वांनी खेद व्यक्त केलाय. तसंच मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष देशातील शेतकऱ्यांविरोधात ज्या क्रुरतेनं वागत आहे, देशात जागोजागी सुरु असलेली शेतकऱ्यांची आंदोलनं चिरडण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. त्याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे. लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, अशी आमची माहिती आहे. त्यामुळे ज्या बेमुवर्तखोरपणे उत्तर प्रदेश सरकार आरोपींवर कारवाई करत नाही, त्याचाही निषेध झाला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी