28 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीय...पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?; मनसेचा खोचक सवाल

…पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?; मनसेचा खोचक सवाल

टीम लय भारी

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरुध्द मनसे हा संघर्ष काही नवीन नाही. मनसे मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आजपासून घटस्थापना होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस (MNS) शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल केला आहे. उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेले दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी केला आहे (MNS targeted CM Uddhav Thackeray once again).

शालिनी ठाकरे यांनी ट्विट करून हा खोचक सवाल केला आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री आणि वर्षा या निवासस्थानातूनच कामे केली होती. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीची पाहणीही केली होती. तोच धागा पकडून शालिनी ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

MNS : दीनानाथ नाट्यगृहातील डागडुजीच्या कामात १६ कोटींचा भ्रष्टाचार : अमेय खोपकर

MNS vs SS : मनसेने जे केले ते उघडपणे केले; शिवसेनेसारखे लग्न एकाबरोबर अन् लफडं दुस-यासोबत केले नाही! संदीप देशपांडे यांचे अनिल परबांना प्रत्युत्तर

देवींना रोज एक गाऱ्हाणे

आजपासून नवरात्र उत्सवाला संपूर्ण देशात सुरुवात होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील जागृत देवींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला सद्भबुद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. आज महाराष्ट्रात महिलांवरील वाढत चालले अत्याचार, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना शासकीय मदत, खड्डेमय रस्ते, हिंदू सणांवर कोरोनाच्या निमित्ताने आणलेले निर्बंध, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित आणि असे अनेक विषय प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र जनतेची फसवणूक करत आहे. जनतेचा आवाज या बहिऱ्या सरकारपर्यंत आईच्या माध्यमातून पोहचावा अशी आशा आहे, असंही शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

MNS Effect : मनसेच्या मागणीला अ‍ॅमेझॉनचा प्रतिसाद, मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करणार

Maharashtra: 21 stray dogs found dead in Ratnagiri city, FIR lodged

मुख्यमंत्र्यांचं सपत्नीक मुंबादेवीचं दर्शन

दरम्यान, घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

...पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?; मनसेचा खोचक सवाल

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी