27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयएका नावात घोळ झाला, माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी येवलेकरांची मागितली माफी

एका नावात घोळ झाला, माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी येवलेकरांची मागितली माफी

राष्ट्रवादीत उभी फुट पल्यानंतर आज पहिल्यांदा शरद पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री झालेल्या छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात जाहीर सभा घेत येवलेकरांची माफी मागितली. या सभेत बोलताना ते म्हणाले, माझा अंदाज चुकत नाही पण एका नावात घोटाळा झाला. माझा अंदाज चुकला, तुम्हाला सगळ्यांना यातना होत असतील पण मी आज येथे तुमच्या सगळ्यांची माफी मागण्यासाठी आलो आहे, पुन्हा येईन तेव्हा योग्य नाव सांगेन असे देखील शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर येवला मतदार संघातून छगन भुजबळांना ताकद देत मतदारसंघ बांधला. भुजबळांना या मतदार संघातून कायम मोठ्या मताधिक्याने निवडून येता आले. काँग्रेसी विचारांचा असलेल्या नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांना बळ दिले. शरद पवारांची 32 वर्षांची साथ सोडून पवारांचे पुतणे आणि सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांसोबत छगन भुजबळ गेले आहेत. छगन भुजबळ हे शरद पवारांचे अत्यंत विश्सासू साथीदारांपैकी एक मानले जात होते. मात्र पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांनी पवारांवरच जोरदार टीका करायला सुरुवात केली.

पवारांच्या वयावरुन त्यांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांविरोधात मात्र पवारांनी शड्डू ठोकत खिलाडूवृत्तीने ते मैदानात उतरले आहेत. वैयक्तीक टीका करणार नाही. तसेच जे वैयक्तीक टीका करतील त्यांची देखील खैर नाही असा इशारा आजच्या सभेत पवारांनी दिलाच पण मतदारांची माफी मागत एक भावनिक साद देखील त्यांनी घातली. माझा अंदाज कधी चुकत नाही पण एका नावाबाबत माझा अंदाज चुकला. पवार म्हणाले, काही लोकांना आम्ही लोकांसमोर सादर केल्यानंतर विधानसभेत त्यांना आणायचे असेल तर विश्वासू मतदार संघ म्हणून आम्ही येवल्याची निवड केली. नाव कधी चुकले नाही पण एका नावात घोटाळा झाला. आज मी इथे आलो आहे, कोणाचे कौतुक करण्यासाठी, टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी. माझा अंदाज चुकत नाही पण अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला तुम्हाला यातना झाल्या असतील तर तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे. आज उद्या लोकांसमोर जाण्याची वेळ येईल, तेव्हा पुन्हा येईन आणि योग्य नाव सांगेन असे पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘एक सही संतापाची’; मनसेच्या आंदोलनाला मुंबईत उदंड प्रतिसाद

वयावर जाल तर किंमत चुकवावी लागेल; शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा

आज महाराष्ट्रात ईडी नावाचे नवे देवस्थान; अमोल कोल्हे यांचा येवल्यातून घणाघात

शरद पवार आता छगन भुजबळांविरोधात तगडा उमेदवार देणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र हा तगडा उमेदवार कोण असेल हे आजच्या सभेत त्यांनी उघड केले नाही. आगामी राजकीय घडामोडी पाहून योग्य वेळ आल्यानंतर पवार छगन भुजबळांविरोधात उमेदवार देतीलच पण त्याच्यासाठी पुन्हा येवल्यात येऊन प्रचार देखील करतील अशी चिन्हे दिसत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी