29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयआणि प्रतिभाताई शरद पवार ढसाढसा रडू लागल्या..

आणि प्रतिभाताई शरद पवार ढसाढसा रडू लागल्या..

आपले अश्रू व्यर्थ जाणार नाही.. सोनिया दुहान यांची भावनिक पोस्ट. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नी असते असे म्हणतात. शरद पवार यांनाही प्रतिभा शरद पवार यांनी मोलाची साथ दिलेली आहे. पवार यांचे व्यस्त वेळापत्रक असताना त्यांनी घरातील जबाबदारी तर पार पाडलीच, शिवाय त्या शरद पवार यांच्या पाठीमागे दु;खाच्या प्रसंगी कायम सावलीसारख्या राहत आलेल्या आहेत. अजित पवार यांचे बालपण शरद पवार यांच्या घरात गेले आहे. त्यामुळे त्यांच्या लाडक्या ‘अजितने’ काका विरोधात बंड केल्याने त्या व्यथित आहेत. आज त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येताना शरद पवार यांच्यासोबत असताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. माध्यमांच्या प्रतिनिधींनी हा भावनिक क्षण टिपला. राष्ट्रवादीच्या दिल्ली येथील पदाधिकारी सोनिया दुहान यांनी ‘काकू, आपले अश्रू व्यर्थ जाणार नाही.. ‘ अशा शब्दात हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

रविवारपासून अजित पवार यांच्या बंडानंतर पवार कुटुंबात काय वातावरण आहे याची उत्सुकता राष्ट्रवादीसह पवार यांना मानणाऱ्या सर्वपक्षीय नेते/ कार्यकर्ते यांना होती. विशेषतः प्रतिभा पवार यांनी सत्तरी पार केलेली आहे, पवार यांनी 80 वर्ष पार केले आहे. या वयात अजित पवार यांनी काकाला त्रास दिला ही बाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते मंडळींना रुचली नाही. त्यांच्या कुटुंबाला, कुटुंब प्रमुखाला झालेला त्रास आवडलेला नाही. असे असताना शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

प्रतिभा पवार आणि अजित पवार यांचेही भावनिक नाते आहे. अजित पवार यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यावर ते शरद पवार यांच्या घरात लहानपणापासून राहिले. शरद पवार कामात व्यस्त असताना प्रतिभा पवार यांनी अजित पवार यांचे आईसारखे लाड पुरवले. त्यामुळे अजित पवार यांनी बंड केल्यावर त्या सगळ्यात जास्त अस्वस्थ झाल्या होत्या. फक्त त्या आतल्या आत कुडत होत्या. पण बुधवारी त्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला अन त्यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.

हे सुध्दा वाचा:

सायन-चुनाभट्टीकडून चेंबूरकडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचला, 40 ते 50 गाड्यांचे नुकसान

40 पेक्षा अधिक आमदार बैठकीला उपस्थित; छगन भुजबळ यांचा दावा

‘ गडी एकटा निघाला, 83 वर्षाचा योद्धा’, शरद पवार गटाकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी

 

राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचे ऋणानुबंध नवे नाहीत. राज ठाकरे हेही बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात लहानाचे मोठे झाले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांना सांगितल्यावर मातोश्रीवर धीरगंभीर वातावरण निर्माण झाले होते. अशी आठवण अनेक शिवसेना नेत्यानी व्यक्त केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी