27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयपाऊस आला आणि पवारांना विरोध करणारा संपून गेला...

पाऊस आला आणि पवारांना विरोध करणारा संपून गेला…

रविवारी अजित पवार यांनी काका शरद पवार यांना अखेरचा सलाम करत भाजपची वाट धरली. आणि या पक्षातील सगळ्यात वयोवृद्ध, जाणता राजा अर्थात शरद पवार यांचे अवसान गळेल असे वाटले होते. पण झाले उलटेच. पक्षातील आश्वासक नेता मीच आहे, असे सांगणाऱ्या शरद पवार यांनी सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील समाधी स्थळाला भेट देऊन पुनः नव्याने पक्ष बांधण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पवार 83 व्या वर्षीही पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.
शनिवारी सायंकाळी चार वाजता त्यांनी येवल्याला सभा घेतली. या सभेसाठी ते मुंबई ते नाशिक रस्ते मार्गाने गेले. या मार्गावर दुतर्फा कार्यकर्त्यांचे ताफे त्यांच्या स्वागताला होते. बाहेर पाऊस कोसळत होता. कार्यकर्ते आपल्या विठ्ठलाला/ साहेबाला भेटायला आसुसले होते. ही बाब लक्षात येताच बाहेर पाऊस पडत असताना ते गाडीतून उतरून कार्यकर्त्यांना भेटत होते. पवार पावसात भिजल्यावर त्यांच्या विरोधकाचा पराभव करतात हे आपण साताऱ्यातील 2019 मधील पोत निवडणुकीत पहिले होते. या निवडणुकीत भर पावसात भिजणारे पवार सातारामधील जनतेला अपील झाले अन उदयनराजे भोसले यांचा दारुण प्रभाव झाला. आणि राष्ट्रवादीचे विनायकराव पाटील यांचा दणदणीत विजय झाला. त्या प्रसंगाची आठवण आज ताजी झाली. येवल्याला पवार जाताना असाच पाऊस आला आणि पवार यांनी ‘पूर्वी दिलेला उमेदवार चुकला,’ असे सांगून छगन भुजबळ यांचा बाजार उठवण्याची तयारी केल्याची जोरदार चर्चा शनिवारी नाशिकमध्ये होती.

राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले यांनी राजीनामा दिल्यावर लागलेल्या पोटनिवडणुकीची धुरा पवारांनी हाती घेत या जिल्ह्यात सभांचा सपाटा लावला. सानथोर मंडळी पवार यांच्या भाषणाला हजेरी लावू लागले. निवडणूक प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना एक सभेत पवार बोलत असताना पावसाचे आगमन झाले. पण 77 वर्षाचे पवार हटले नाही. त्यांनी जोर’धार’ पावसात भाषण करून उदयनराजे भोसले यांचा प्रभाव केला. भुजबळ शिवसेना सोडून गेल्यावर 30 वर्ष पवार यांच्याबरोबर राजकारणात वावरले. आधी कॉंग्रेस त्यानंतर राष्ट्रवादीत आलेल्या भुजबळ यांना पवार यांनी ओबीसी नेता म्हणून पुढे केले. राज्याचे उप मुख्यमंत्री केले. गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम आदी मलाईदार खाते दिले. त्या जिवावर भुजबळ यांनी भौतिक विकास साधून घेतला. असे सगळे काही असताना ‘अजित पवार यांचे काय चालले आहे पाहून येतो’, असे पवार यांना सांगून गेलेले भुजबळ रविवारी राजभवनात मंत्री पदाची शपथ घेताना दिसले.

हे सुद्धा वाचा
पियो लेकिन रखो हिसाब… रविवारी गटारीचा जल्लोष

एका नावात घोळ झाला, माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी येवलेकरांची मागितली माफी

‘एक सही संतापाची’; मनसेच्या आंदोलनाला मुंबईत उदंड प्रतिसाद

एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरु मानणारे भुजबळ 90 च्या दशकात 14 आमदारांना घेऊन नागपूर अधिवेशनात कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. ओबीसी असल्याने पक्षात डावलत असल्याचे कारण तेव्हा भुजबळ यांनी पुढे रेटले होते. त्यानंतर भुजबळ यांना पवार यांनी पोलिस प्रोटेक्शन दिले. मुंबईमध्ये शिवसेनेने हल्ला केला तेव्हा पोलिसांमुळे भुजबळ वाचले. हा इतिहास असताना भुजबळ पवार यांना सोडून जाणे भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना आवडले नाही. पवार यांनाही ते रुचले नसल्याने भुजबळ कितीही बोलो पवार माझे विठ्ठल आहेत, पण पवार यांनी आता भुजबळ यांचा कार्यक्रम करायचे ठरवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी