30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी पवारांचे आव्हाड यांना बळ; राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी,...

एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी पवारांचे आव्हाड यांना बळ; राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी, पक्ष प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीत उभी फुट पडली असून अजित पवार यांच्या नेतृत्वात नऊ आमदारांनी आज शिंदे-फडणवीस सरकारात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीतील ३५ ते ४० आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी उलथापालथ दिसून येत आहे, अशातच शरद पवार यांनी आपले विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांना राज्याचे विरोधीपक्षनेतेपद दिले असून पक्षाचे प्रतोदपद देखील त्यांच्याकडे दिले आहे. ठाण्यात सध्या शिंदे-आव्हाड यांच्यात वितुष्ठ आहे, अशा स्थितीत शिंदेंना शह देण्यासाठी आव्हाड यांना बळ दिल्याची चर्चा आहे.

एकेकाळी मित्र असणारे आणि सध्या जानी दुश्मन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यात सद्या विस्तव जात नाही. आंदोलन आणि विविध मार्गाने हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करत असतात. ठाणे हा शिंदे यांचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यावर आपले वर्चस्व राहण्यासाठी आव्हाड कायम शिवसेना बरोबर पंगा घेतात. यातून त्यांना दोनदा अटकही झाली होती. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेकडून आव्हाड यांच्यावर आरोप होत आहेत.

गेल्या वर्षी हर हर महादेव हा चित्रपट ठाण्यात बंद पाडत प्रेक्षक मंडळीना धक्काबुक्की झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली. त्यानंतर एका महिलेचा कथीत विनयभंग प्रकरणी आव्हाड यांना अटक झाली होती. या नंतर महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर प्रकरण आव्हाड यांच्यावर उलटवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसफूस सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
मंत्री मंडळात राष्ट्रवादीचे नऊ मंत्री; शिंदे गटात अस्वस्थता
राष्ट्रवादी भ्रष्ट पक्ष असेल तर त्याचे आमदार भाजपला कसे चालतात?; शरद पवार यांचा मोदी यांना सवाल
शिवसेनेनंतर एक वर्षांनी राष्ट्रवादीत भूकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या ३० आमदारांचा सरकारला पाठिंबा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी