29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयवयावर जाल तर किंमत चुकवावी लागेल; शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा

वयावर जाल तर किंमत चुकवावी लागेल; शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा

अजित पवार यांनी पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवारांच्या वयावरुन त्यांच्यावर टीका केली होती. त्याला आज येवल्यातील सभेत शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ”काही लोक म्हणतात वय झालं जास्त सांगायची गरज वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल. आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार व्यक्तीगत हल्ले आम्हाला सहन होणार नाहीत. जर व्यक्तीगत हल्ले केले तर त्याची किंमत चुकवावी लागेल, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, काही लोकांना आम्ही जनतेच्या लोकांसमोर सादर केल्यानंतर विधानसभेत त्यांना आणायचे असेल तर विश्वासू मतदार संघ म्हणून आम्ही येवल्याची निवड केली. नाव कधी चुकले नाही पण एका नावात घोटाळा झाला. आज मी इथे आलो आहे, कोणाचे कौतुक करण्यासाठी टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी माझा अंदाज चुकत नाही पण अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला तुम्हाला यातना झाल्या असतील तर तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे. आज उद्या लोकांसमोर जाण्याची वेळ येईल तेव्हा पुन्हा येईन आणि योग्य नाव सांगेन असे पवार म्हणाले.

 

हे सुद्धा वाचा

आज महाराष्ट्रात ईडी नावाचे नवे देवस्थान; अमोल कोल्हे यांचा येवल्यातून घणाघात

‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’! म्हणत शरद पवारांनी केली नव्या इनिंगची सुरुवात

शरद पवार यांचे मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

पवार म्हणाले, या मतदार संघाचा इतिहास मोठा आहे, स्वातंत्र्यलढ्यात तात्या टोपेंनी एतिहासिक काम केले त्यांची ही भूमी, स्वातंत्र्य तळवळीत हा जिल्हा, तालुका अग्रेसर राहिला. येथील स्वाभीमानी लोकांनी शक्ती देण्याची गरज आहे. त्यामुळे काही लोकांना बळ द्यावे लागेल. मागील काळात चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर दुरुस्त कराव्या लागतील. पंतप्रधानांनी काँग्रेसवर आरोप केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले. राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सांगतो ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील माझे जाहीर त्यांना सांगणे आहे, आमच्यापैकी कोणी भ्रष्टाचारात सहभागी असेल त्याची चौकशी करुन सजा द्या त्यासाठी आमचा पाठिंबा राहील.एकच मनात आहे, अनेक क्षेत्रात नाशिक पुढे जातोय येवल्याचे अनेक प्रश्न बाकी आहेत, त्यासाठी जे काही करायचे आहे ते करु, असे आश्वास पवार यांनी यावेळी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी