27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयउरल्या-सुरल्या शेकापचा बुरूज ढासळू लागला; माजी आमदार विवेक पाटील यांचा राजीनामा

उरल्या-सुरल्या शेकापचा बुरूज ढासळू लागला; माजी आमदार विवेक पाटील यांचा राजीनामा

कॉँग्रेससची काही ध्येय धोरणे मान्य न झाल्याने त्यातून बाहेर पडलेल्या किंबहुना शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी २ व ३ ऑगस्ट १९४७ रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे-केशवराव जेधे यांनी निवडक कार्यकर्त्यांची सभा घेतली. या सभेला जी. डी. लाड, के. पा. खडके, कृष्णराव धुडूप, मुळीक, शिरोळे, नाथाजी लाड, बाबूराव जेधे उपस्थित होते. याच बैठकीत आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला. राज्याच्या राजकारणात या पक्षाचे योगदान महत्वाचे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मातोश्री शारदा पवार या पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. तर शेकापचे एन. डी. पाटील ही त्यांचे जावई होते. असा हा शेतकऱ्यांचा पक्ष दिवसेंदिवस राज्याच्या राजकारणातून अस्तंगत होत असताना रायगडचे विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, विवेक पाटील यांनी या पक्षात प्राण ओतण्याचा पर्यटन केला असतानाच, मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात कर्नाळा बॅंक गैर व्यवहारात अटकेत असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कारागृहातून पत्र जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय राजकारणातून राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे.

पाटील यांचे राजीनामा पत्र गुरुवार सकाळपासून समाज माध्यमांवर पसरल्याने पनवेलमध्ये राजकीय चर्चेला सुरुवात झाली. शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी हे राजीनामा पत्र खरं असल्याचे सांगत ही शेकाप कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी दुदैवी बाब असल्याचे यावेळी स्पष्ट केले. परंतु लवकरच विवेक पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी विनंती करणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले. विवेक पाटील हे शेकापमध्ये १९७९ पासून सक्रिय होते. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती तसेच चार वेळा विधानसभा सदस्य म्हणून ते निवडून आले होते. २० वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी पनवेलमधील लेडीज सर्व्हिसबारमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा विधिमंडळात मांडल्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदी राज्यात लागू केली होती.

ही सुद्धा वाचा:

टोमॅटोचे दर पडले तेव्हा केंद्र सरकारने नाफेडतर्फे का खरेदी केली नाही; शेतकरी नेत्यांमध्ये संताप

मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार- आमदार बच्चू कडू

बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडाने विस्कळीत झालेली सेवा सुरळीत

चार वर्षांपूर्वी विवेक पाटील यांच्यावर ते अध्यक्ष असलेल्या कर्नाळा बॅंकेत त्यांनी ५४८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. विवेक पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र आणि बॅंकेच्या इतर संचालकांवर कारवाई सुरू असताना विवेक पाटील यांनी शेकापमधून राजीनामा दिल्याची घोषणा केल्याने पनवेल व उरण परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पूत्र भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा बँकेचे प्रकरण उजेडात आणून विवेक पाटील यांच्यावर कारवाई करण्यास सीआयडी आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) विभागांना भाग पाडले होते. यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी ईडी कार्यालयात पाठपुरावा केला होता. जयंत पाटील आणि विवेक पाटील हे रायगडमधून शेकापची धुरा वाहत होते. त्यांना शेकापचा बुरूज म्हटले जायचे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी