27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांचे अर्थमंत्रीपद रोखण्यासाठी शिंदेगट दिल्लीत - संजय राऊत

अजित पवारांचे अर्थमंत्रीपद रोखण्यासाठी शिंदेगट दिल्लीत – संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंड करून अजित पवार गट सत्तेत सामील झाला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर खाते वाटपाची चर्चा सुरू होती. अखेर काल खातेवाटप करण्यात आले. यामध्ये अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले. याविषयी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळू नये म्हणून शिंदे गट दिल्लीत गेला होता. पण दिल्लीत कोणीही त्यांचे ऐकून घेतले नाही असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळाल्यामुळे शिंदे गटामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार अर्थमंत्री होते तेव्हा शिंदेगटातील आमदारांनी निधी मिळत नाही हे कारण देऊ बंड केल होत. आत्ता अर्थखात अजित पवार यांच्याकडे जाऊ नये म्हणू शिंदे गटाचे आमदार दिल्लीत गेले होते, पण दिल्लीत त्यांच कुणीही ऐकून घेतल नाही. त्यांना स्पष्ट पणे सांगण्यात आले की तुम्हाला राहायच असेल तर रहा नाही तर जाऊ शकता. अस संजय राऊत यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिकमध्ये स्वागत होताच आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केला पाठिंबा

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा राहत्या घरी आढळला मृतदेह

भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांना मंत्रीपदाची हुलकावणी

शिंदे गटाच्या विरोधावर दिल्लीतून एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यामध्ये अजित पवारांना अर्थमंत्रीपद द्यायच नसेल तर शिंदे गटाने ते स्वत: कडे ठेवावे आणि मंत्रीपद हे अजित पवार यांना द्या अस सांगण्यात आले होते अस संजय राऊत म्हणाले. तसेच अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार सोबत जाण्याच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. या निर्णयामुळे राज्याचे नुकसान होणार आहे. पण शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि शिंदे गट फारकाळ सत्तेत राहणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. अर्थखात अजित पवार यांच्या कडे गेल्यामुळे आम्हाला फरक पडत नाही अस शिंदे गटाचे नेते म्हणत आहेत पण, त्यांच्याकडे पर्याय नाही त्यांना आजित पवारांची धुनीभांडी करावी लागतील, अस संजय राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी