29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशिंदे गटाच्या आमदार मंडळींची नाराजी दूर करण्याचा फॉर्म्युला ठरला

शिंदे गटाच्या आमदार मंडळींची नाराजी दूर करण्याचा फॉर्म्युला ठरला

अजित पवार शिंदे-फडणवीस मंत्री मंडळाचा भाग झाल्याने शिवाय राष्ट्रवादीला नऊ मंत्री पदे मिळाल्याने शिवसेना शिंदे गटात गेल्या पाच दिवसापासून धुसफूस आहे. दोन आमदार याच मुद्द्यावर एकमेकांवर भिडल्याने बुधवारी रात्री नंदनवन या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तासभर चर्चा झाली. शिवसेना आमदारांच्या नाराजीचे सूक्ष्म कारण फडणवीस यांनी शिंदे यांच्याकडून समजून घेतले, त्यानंतर दोघांनी एक फॉर्म्युला तयार केला. त्यात लवकरात लवकर मंत्री मंडळ विस्तार आणि महामंडळ वाटप दोन्ही पक्षांच्या आमदारांना करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचे ढंग दाटले होते. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सर्व महत्त्वाची खाती हे राष्ट्रवादीच्या वाटेला जातील, अशी शिवसेना आमदारांची तक्रार असल्याची चर्चा आहे. तसेच अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी निधी न देण्याच्या कारणास्तव महाविकास आघाडी सरकारमधून आमदार बाहेर पडले. पण आता अजित पवार यांना सत्तेत घेतलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेना आमदारांचा विरोध असल्याची देखील माहिती समोर आली होती. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत धुसफूस असल्याने सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे. त्यातच भाजपकडून आता शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. म्हणूनच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे.

जवळपास तासभर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची काल महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिवसेनेची नाराजी आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा 

खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात, सर्वोच्च न्यायालयात जाऊ: नाना पटोले

राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाकडून दिलासा नाही; आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

दरम्यान, दोन्ही नेत्यांकडून नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या आठवड्याभरात विस्तार करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. आता होणाऱ्या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या नेत्याना सर्वाधिक स्थान मिळणार आहे. सरकारचा मंत्रीमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करुन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल, असे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी