33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयकोरोना मध्ये नोकरी गेलेल्या बेरोजगार शिवसैनिकांना रोजगार देण्याचा हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचा...

कोरोना मध्ये नोकरी गेलेल्या बेरोजगार शिवसैनिकांना रोजगार देण्याचा हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचा अनोखा उपक्रम

रवींद्र भोजने : टीम लय भारी                               

मुंबई :  कोरोना काळात नोकरी गमावलेल्या बेरोजगार  शिवसैनिकांना रोजगार देण्याचा अनोखा उपक्रम हिंदुस्तान माथाडी कामगार सेना आणि वाहतूक सेना व शिवसेना शाखा क्रमांक 234 च्या वतीने संयुक्तरित्या या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.(Shiv Sainiks who lost their jobs in Corona Employment to unemployed)

शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष व पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये दक्षिण मुंबई विभाग प्रमुख श्री. पांडुरंग सपकाळ, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अरुण दुधवडकर आणि हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र वाहतूक सेना उपाध्यक्ष श्री.शंकर झोरे,   कोषाध्यक्ष उमेश मिठबावकर, सेक्रेटरी नाथा दळवी सुरेश धनावडे, नगरसेविका सुजाता सानप, कुलाबा विधानसभा संघटक माजी नगरसेवक गणेश सानप, युवासेना दक्षिण मुंबई अध्यक्ष प्रथमेश सकपाळ, वाहतूक सेना  उपाध्यक्ष गिरीश विचारे, सूर्यकांत तांडेल, हिंदुस्तान माथाडी कामगार सेना कार्याध्यक्ष श्री तावडे, शाखा प्रमुख जयवंत नाईक

चिटणीस विशाल काळे समाजसेवक संपत खाटपे, युवा सेना शाखा अध्यक्ष मंगेश आग्रे,  युवा सेना कुलाबा संघटक संदीप नलावडे, उपशाखाप्रमुख प्रदीप शिंदे,  समाजसेवक सलीम भाई, प्रकाश शेट्टी आणि  माथाडी कामगार नेते मोरे साहेब, इब्राहिम लाला, जोसेफ या सर्वांच्या अथक प्रयत्नातून शिवसैनिकांना रोजगार मिळवून देण्याचा उपक्रम सध्या सुरू करण्यात आला असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जे जे स्कूल ऑफ आर्ट डी एन रोड या ठिकाणी सुरू करण्यात आला. असून शालेय विद्यार्थ्यांना स्वस्त दरात शालेय वस्तूंची खरेदी करता येते.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांची सूचना, महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका

आमदार मनिषा कायंदेंचा टोला, स्टंटबाज नेते किरीट सोमय्या सपशेल आपटले

मुंबईच्या गरज लक्षात घेऊन बजेट बनवले आहे, आदित्य ठाकरे सूचक वक्तव्य

Tax Raids On Shiv Sena Councillor Timed With Mumbai Civic Polls: Sanjay Raut

दक्षिण मुंबईतील जनतेला असे आव्हान करण्यात आले आहे की,  या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहून आणि आणि स्वस्त दरात खरेदी करावी. महिलांसाठी उपयोगी असलेल्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत,   कला-क्रीडा यासाठी प्रोत्साहन देणार आणि महिला बचत गटासाठी आणि बेरोजगारांसाठी प्राधान्य देणार असून यासाठी आमच्या क्रोफर्ड  मार्केट येथील  जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, अशी माहिती  श्री. शंकर झोरे यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी