33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयअमित शहा काश्मीर दौऱ्यावर आहेत; संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!

अमित शहा काश्मीर दौऱ्यावर आहेत; संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!

टीम लय भारी

नाशिक : जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदुंना लक्ष्य केलं जात आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशातही हिंदू वस्त्यांवर हल्ले केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू-काश्मिर दौऱ्यावर गेले आहेत. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी अमित शाहांनी काही दिवस काश्मिरमध्येच राहावं, अशी टिप्पणी केलीय (Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Modi government).

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मिर दौऱ्यावर आहेत, असं एका पत्रकारानं म्हटलं. त्यावर संजय राऊत यांनी लगेच ‘चांगली गोष्ट आहे. त्यांनी तिथेच राहावं काही दिवस. अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, गुलमर्ग या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरु आहे. देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, अशी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांनी १०० कोटी लसीकरणाच्या आकडेवारीसंदर्भात उपस्थित केली शंका, म्हणाले…

बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत : संजय राऊत

‘आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष, मुळ पुरुष’

दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या सामनातील अग्रलेखावरुन संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. शेलारांच्या टीकेला राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. ‘आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष, मुळ पुरुष आहोत आम्हाला कसं काय कुणी शिकवून चालेल. बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, पळून नाही गेलो. तुम्हीच पळून गेलात. काश्मिर खोऱ्यात जे हिंदुंचं हत्याकांड सुरु आहे. बांग्लादेशात जे हिंदुंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत. त्या हिंदुंना संरक्षण देण्याबाबत आजच्या सामनातील अग्रलेखात प्रश्न उपस्थित केलाय’, असं राऊत म्हणाले.

प्रियंका गांधींनी गाडी थांबवली अन् जखमी अपघातग्रस्त महिलेची स्वत: केली मलमपट्टी

Maharashtra: Shiv Sena MP Sanjay Raut alleges corruption of over Rs 500 crore in BJP-ruled corporation

‘..तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी’

‘देशाबाहेरील हिंदू असेल किंवा काश्मिरमधील हिंदू असेल, त्यांचं संरक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे, असं म्हणणं हे काय दारिद्र्य झालं का? असं तर कुणी म्हणत असेल तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी. आम्ही म्हणतोय हिंदुंचं रक्षण करा, आम्ही म्हणतोय बांग्लादेशातील हिंदुंना संरक्षण द्या. मोदी सरकारनं बांग्लादेशवर दबाव आणला पाहिजे. भाजपचे खासदार स्वामी असं म्हणतात कि हिंदुस्तानने हिंदुंच्या विषयावर बांगलादेशशी युद्ध केलं पाहिजे, मग यावर मिस्टर शेलार काय म्हणतात? काश्मिर खोऱ्यात मागील 17 दिवसांत हिंदू आणि शिखांच्या एकूण 21 हत्या झाल्या. तर 19 पोलिस आणि जवान मारले गेले आहेत. मग हा प्रश्न विचारणं हे दारिद्र्य झालं का?’ असा सवालही राऊत यांनी विचारलाय.

किरीट सोमय्यांनाही प्रत्युत्तर

संजय राऊत हे नेमके ठाकरेंचे की पवारांचे प्रवक्ते आहेत? असा सवाल विचारला. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केलीय. ‘मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे काय परग्रहावरुन आलेत का? शरद पवार हे या देशाचे महत्वाचे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहिती नसेल तर सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारांना आपले गुरु मानतात. त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, पवार माझे गुरु आहेत. त्यांचं बोट धरुन मी राजकारणात आलोय. म्हणजे एकप्रकारे हे सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. मोदींच्या गुरुचा अपमान करत आहेत’, अशा शब्दात सोमय्या यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी