29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
HomeमनोरंजनHappy Birthday Malaika Arora: अर्जुनने मलायकासाठी केली खास रोमँटिक पोस्ट म्हणाला…

Happy Birthday Malaika Arora: अर्जुनने मलायकासाठी केली खास रोमँटिक पोस्ट म्हणाला…

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा आज तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायका सध्या  अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत आहे. अर्जुन कपूरने आज मलायकाच्या वाढदिवसानिमित्त   शेअर केलेल्या खास पोस्टमुळे  सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर मलायका आरोरा आणि अर्जुन कपूर यांचे फोटो काही नवीन नाहीत. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मात्र आता केलेली पोस्ट काही खास आहे. त्यात अर्जुनने मलायकासाठी लिहिलेल्या कॅप्शने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.( Arjun Kapoor special romantic posts for Malaika Aurora)

अर्जुन कपूरने मलायकासोबतचा एक फोटो शेअर केलाय ज्यात मलायका फारच खुश दिसत असून ती अर्जुनच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. दोघेही या फोटोमध्ये पार्टीमूडमध्ये दिसत आहेत. अर्जुनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आजचा दिवस असो किंवा इतर कोणताही दिवस मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे

बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे भाऊ-बहिण

रणवीर-दीपिका आता क्रिकेटच्या मैदानावर घालणार धुमाकूळ!

या वर्षात तुला सर्वाधिक आनंद मिळो अशी मी प्रार्थना करतो.’ अर्जुनने हा फोट शेअर करताच फोटोला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार तसेच मलायकाचे फॅन्स तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

‘द इनकार्नेशन सीता’ सिनेमात ‘हा’ अभिनेता साकाणार लंकाधिपती रावण?

Arjun Kapoor Shares A Beautiful Birthday Wish For Ladylove Malaika Arora

अर्जुन कपूर शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेत्री करीना कपूर हिने कमेंट करत ‘आय वॉन्ट फोटो क्रेटिड अर्जून कपूर’, असे म्हटले आहे. अभिनेत्री मलायका आणि करीना या दोघी बेस्ट फ्रेंड असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. दोघीही नेहमी एकमेकींविषयी प्रेम व्यक्त करत असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी