30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयतुमच्या वाघाचा ससा होतो का म्हणत, गोपीचंद पडळकरांची संजय राऊतांवर टीका

तुमच्या वाघाचा ससा होतो का म्हणत, गोपीचंद पडळकरांची संजय राऊतांवर टीका

टीम लय भारी

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का असे म्हणत पडळकरांनी टीका केली आहे (Gopichand Padalkar criticizes Sanjay Raut).

तुमच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर उलटसुलट टीका लिहिणारे लेख लिहितात. त्यावेळी आपली सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का असा सवाल पडळकर यांनी राऊत यांना केला आहे.

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

त्याचबरोबर महाराष्ट्रात औरंगजेबची स्तुती करणाऱ्या पोस्ट लिहिल्या जातात आणि त्यावरून उस्मानाबाद येथे दंगे होतात. तुमची महाराष्ट्रातील कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठी तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठं मोठे लेख लिहतात. हिंदू सणांच्या वेळी हिंदुत्वाची शान असलेला भगवा झेंडा लावण्यावरून जर उस्मानाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी उस्मानाबादला धाराशिव म्हणाऱ्यांच्या हाताला लकवा मारतो काय? असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा

BJP looks to win over ‘voters of tomorrow’ for 2029 polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी