33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशिवसेनेने RSS नेत्याच्या मुलाला पणजीतून दिली उमेदवारी

शिवसेनेने RSS नेत्याच्या मुलाला पणजीतून दिली उमेदवारी

टीम लय भारी

पणजी : आरएसएसचे गोवा युनिटचे माजी नेते सुभाष वेलिंगकर यांचा मुलगा शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात शैलेंद्र वेलिंगकर पणजीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.शैलेंद्रचे वडील सुभाष वेलिंगकर हे आरएसएसमधील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते कारण त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा प्रांताची स्थापना झाली होती(Shiv Sena nominates RSS leader’s son from Panaji).

शिवसेनेने जाहीर केलेल्या नऊ उमेदवारांच्या यादीनुसार, सुभाष केरकर हे पेरनेममधून, जितेश जे. कामत म्हापसामधून, व्हिन्सेंट परेरा सिओलीममधून, गोविंद गोवेकर अल्डोनामधून गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.पक्षाने पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर, पोरीममधून गुरुदास गावकर, वालपोईमधून देविदास गावकर, वास्को द गामामधून मारुती शिरगावकर आणि क्यूपेममधून  फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकले !

गोवा निवडणुक : शिवसेनेने केली उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपने मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना पणजीतून तिकीट नाकारलं

Poor Goa Performance By AAP, Sena, Trinamool In Earlier Polls, Show Data

अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रीकर यांना ‘आप’मध्ये येण्याचे निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेनेही गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला पाठिंबा दिला आहे. उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेना पणजीतून आपला उमेदवार मागे घेईल, असे संजय राऊत म्हणाले.मात्र, उत्पल विजयी झाल्यास भाजपमध्ये सहभागी होणार नाही किंवा पाठिंबा देणार नाही, अशी अट शिवसेनेने घातली आहे.

उत्पल पर्रीकर यांनी शुक्रवारी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ते गोवा विधानसभा निवडणुकीच्या २०२२ च्या निवडणुकीबाबतचा निर्णय जाहीर करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेणार आहेत.मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील पणजी मतदारसंघातून भाजपने अतानासिओ मोन्सेरात ‘बाबुश’ यांना उमेदवारी दिली होती. विद्यमान आमदाराला तिकीट नाकारता येणार नाही, असा पक्षाचा दावा होता.

दरम्यान, ‘अमर जवान ज्योती’वरून झालेल्या वादावर संजय राऊत यांनी शिवसेनेने या विषयावर कोणतीही अंतिम भूमिका घेतली नसल्याचे सांगत भाष्य करण्यास नकार दिला. ‘ज्योती’चा सन्मान करण्याचा सरकारचा हेतू असेल तर ती चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले.आगामी गोवा विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याची निवडणूक १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी