30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयउमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरी

उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरी

टीम लय भारी

पणजी:- गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची आज पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. कारण, गोव्यातील भाजपच्या तीन बड्या नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने आता अपक्ष म्हणून दंड थोपटणार असल्याची माहिती आहे.(BJP the first list of candidates was announced Rebellion)

भाजपने आज गोव्यात 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे कळते.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेने RSS नेत्याच्या मुलाला पणजीतून दिली उमेदवारी

गोवा निवडणुक : शिवसेनेने केली उमेदवारांची पहिली यादी जाहीर

फडणवीसांची मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी अवस्था, संजय राऊतांचा टोला

Goa election 2022: Denied ticket by BJP, Deputy CM’s wife, 2 others to contest as independents

मांद्रे विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी लक्ष्मीकांत पार्सेकरही इच्छुक होते. सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर निवडणूक लढवणार आहेत. सावित्री कवळेकर या उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आहेत. भाजपने केपी मतदारसंघातून चंद्रकांत कवळेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गोव्यातील भाजपमध्ये आणखी एक बंडखोरी पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सावर्डे विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक प्रभुपौसकर हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सावर्डे मतदारसंघात भाजपने गणेश गावकर यांना उमेदवारी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी